महाराष्ट्रआरोग्य व शिक्षण

एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर  

 

सांगली  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2024 मध्ये नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उप सचिव दे. वि. तावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक अनुक्रमे परीक्षा, संवर्ग, परीक्षेचे स्वरूप, जाहिरात, पूर्व परीक्षा दिनांक व मुख्य परीक्षा दिनांक व कंसात निकालाचा अंदाजित महिना पुढीलप्रमाणे.  दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2024 – दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा-2024,  दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, जानेवारी 2024, पूर्व परीक्षा 17 मार्च 2024 (मे 2024). दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-2024, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 27 जुलै 2024 (ऑक्टोबर 2024).

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा-2024 –  महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक, कर सहायक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपिक-टंकलेखक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, फेब्रुवारी 2024, पूर्व परीक्षा 16 जून 2024 (ऑगस्ट 2024).  महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2024 – सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 29 सप्टेंबर 2024 (जानेवारी 2025). सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2024, सहायक मोटार वाहन निरीक्षक गट-क, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 26 ऑक्टोबर 2024 (जानेवारी 2025). महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2024 – कर सहायक, दुय्यक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपीक-टंकलेखक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्‍य परीक्षा 17 नोव्हेंबर 2024 (फेब्रुवारी 2025).

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-2024 – महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-2024, राज्य सेवा-33 संवर्ग, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, कृषि सेवा, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, वनसेवा, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, जानेवारी 2024, पूर्व परीक्षा 28 एप्रिल 2024 (जुलै 2024).

अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2024 – सहायक आयुक्त अनन तथा पदनिर्देशन अधिकारी व अन्न सुरक्षा अधिकारी गट-ब – पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 9 नोव्हेंबर 2024  सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025).

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक अभियंता विद्युत व यांत्रिकी गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 10 नोव्हेंबर 2024, सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025).

महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2024, कृषि अधिकारी गट अ, कृषि अधिकारी गट ब, कृषि अधिकारी गट ब कनिष्ठ, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक १, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025).

महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक अभियंता यांत्रिकी गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025).

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक अभियंता विद्युत गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025).

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक कार्यकारी अभियंता गट-अ (स्थापत्य), सहायक अभियंता गट-अ (स्थापत्य), सहायक अभियंता गट-ब (स्थापत्य) श्रेणी-2, उप विभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-अ, जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024, सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (फेब्रुवारी 2025).

निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा-2024, निरीक्षक वैधमापन शास्त्र गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 1 डिसेंबर 2024, सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025).

राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024, एकूण 33 संवर्ग, पारंपरिक/वर्णनात्मक तसेच वस्तुनिष्ठ  बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 14 डिसेंबर 2024, सकाळ भाषा पेपर-1 मराठी, दुपार भाषा पेपर-2, 15 डिसेंबर 2024, सकाळ सामान्य अध्ययन-2, दुपार सामान्य अध्ययन-1, 16 डिसेंबर 2024 – सकाळ सामान्य अध्ययन-4, दुपार सामान्य अध्ययन-3 (मार्च 2025).

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक वनसंरक्षक गट-अ, वनक्षेत्रपाल गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 28 डिसेंबर 2024, सकाळ कृषि अभियांत्रिकी/रासायनिक अभियांत्रिकी/स्थापत्य अभियांत्रिकी/यांत्रिकी अभियांत्रिकी, दुपार कृषि/पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान, 29 ‍डिसेंबर 2024, सकाळ वनस्पति शास्त्र / प्राणिशास्त्र, दुपार रसायनशास्त्र (मार्च 2025). 30 डिसेंबर 2024 सकाळ गणित/सांख्यिकी, दुपार वनशास्त्र, 31 डिसेंबर 2024 सकाळ भूशास्त्र, दुपार भौतिकशास्त्र (मार्च 2025).

शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशिल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे / येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेव्दारे उपलब्ध करून देण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!