गर्दी टाळण्यासाठी मार्केट यार्डमध्ये होणारी रिटेल विक्री, सौदे बंद : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

0

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले असून, कोरोना विषाणूचे प्रतिबंद करण्यासाठी गर्दी टाळण्यासाठी अटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत. मार्केट यार्ड होणारी गर्दी टाळण्यासाठी या ठिकाणची रिटेल विक्री व सौदे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
आज सांगली येथील मार्केट यार्डमध्ये होणारी गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारावे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, बाजरसमितीचे सभापती दिनकर पाटील, पोलीस निरिक्षक श्री. तनपुरे यांच्यासह व्यपारी, पुरवठाधारक, बाजार समितीचे पदाधिकारी आदी उपस्थितीत होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मार्केट यार्डमध्ये मोठ्याप्रमाणावर होणाऱ्या गर्दीला प्रतिबंध करण्यासाठी व सोशल डिस्टटसिंग यशस्वी करण्यासाठी या ठिकाणची रिटेल विक्री पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वैयक्तीक घरगुती कारणासाठी कोणीही ग्राहक खरेदी करु शकणार नाही. तसेच मार्केट यार्ड परिसरातील बँक, सहकारी पतसंस्था यामधील गर्दी टाळण्यासाठी त्यांच्या वेळांमध्ये बदल करुन दुपारी 12 ते सांयकाळी 5 या वेळेत त्या सुरु राहतील. सदरचा बदल हा मार्केट यार्ड परिसरातील कार्यरत असलेल्या बँका व पतसंस्थांसाठीच आहे. मार्केट यार्डात घेण्यात येणाऱ्या सौद्यांमुळे मोठ्याप्रमाणावर गर्दी जमा होते ती टाळण्यासाठी आडते, पुरवठादार यांनी एकत्रित येऊन मालाच्या किंमती निश्चित कराव्यात असेही त्यांनी निर्देशित केले. ई-नाम प्रणालीद्वारे ऑनलाईन सौदे करता येतील का याचीही चाचपणी करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. पोलीस विभागामार्फत हमाल, व्यापारी, कामगार यांना देण्यात आलेले ओळखपत्र पाहुनच मार्केट यार्ड परिसरात प्रवेश देण्यात येईल. तसेच या परिसरात येणाऱ्या वाहनांचेही निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
मार्केट यार्ड परिसरात काम करणाऱ्या हमाल, व्यापारी, कामगार यांची आरोग्य शिबिरे लावून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये