क्रीडामहाराष्ट्र

दिलदार नेते,उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांच्याकडून मिरज सिध्देवाडीच्या कांस्यपदक विजेत्या स्नेहल खरातचा सन्मान ; भविष्याच्या वाटचालीसाठी आर्थिक मदत

मिरज :-

राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्याच्या 3 किलोमीटर क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवणारी मिरज तालुक्यातील सिध्देवाडी येथील स्नेहल खरात हिचा दिलदार नेते,उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांच्याकडून सन्मान करण्यात आला अन् भविष्याच्या वाटचालीसाठी आर्थिक मदतही करण्यात आली. यशस्वी स्नेहल खरात हिला प्रत्यक्ष घरी भेटून वेळेत मदत केल्याबद्दल उद्योगपती सी आर सांगलीकर यांचे मिरज तालुक्यात कौतुक होत आहे.

मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी येथील स्नेहल भाऊसाहेब खरात ही कळंबी (ता.मिरज) येथील अजितराव घोरपडे विद्यालयाची विद्यार्थीनी आहे.ती इयत्ता 9 वी मध्ये शिकत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत स्नेहल खरात हिने 66 खेळाडूंमध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.यापूर्वी तिने अनेक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.

सिद्धेवाडीसारख्या छोट्याशा गावातील,घरची बेताची परिस्थिती असताना केवळ जिद्द, चिकाटी,आणि गुणवत्तेच्या जोरावर संघर्षातून स्नेहल खरातने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मोठं यश मिळविले यांची माहिती मिळताच दिलदार व्यक्तिमत्व, उद्योगपती सी.आर. सांगलीकर साहेब यांनी स्नेहल खरात हिची सिद्धेवाडी येथे घरी जाऊन भेट घेतली. तिथे शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. स्नेहलच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आर्थिक मदतीचा धनादेशही उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी वडील भाऊसाहेब खरात यांच्या स्वाधीन केला.
उद्योगपती सी आर सांगलीकर सांगलीकर साहेब यांनी केलेला सत्कार आणि आर्थिक मदतीमुळे खरात कुटुंबीय भारावून गेले. स्नेहल खरात हिने सांगलीकर साहेबांनी घरी येऊन केलेल्या सत्कारामुळे आपलं मनोबल उंचावल्याचे आहे . यापुढेही राज्य आणि देश पातळीवरील स्पर्धेसाठी कसून सराव करू असे सांगून अजितराव घोरपडे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.एन. पाटील,कलाशिक्षक आदम अली मुजावर,जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच अभिजीत हजारे यांचे स्नेहल खरात हिने मार्गदर्शन मिळत असल्याचे ती म्हणाली.
यावेळी उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांनी सांगितले की गुणी, होतकरू खेळाडूंसाठी समाजाने मदतीचा हात दिला पाहिजे. खेळांडुना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आपला नेहमीच प्रयत्न असतो आणि यापुढेही असणार आहे. सी.आर.सांगलीकर फौंडेशनच्या माध्यमातून गरीब,गरजू मुलांना आर्थिक मदत,शैक्षणिक साहित्य,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतात. स्नेहल खरात हि अॕलिंपिक पर्यंत निश्चित धावेल. भविष्यात ऑलिम्पिक पर्यंत धाव घेण्यासाठी स्नेहलला लागेल ती मदत आपण करू, अशी ग्वाही उद्योगपती .सी.आर. सांगलीकर यांनी दिली.

 

 

यावेळी प्रास्ताविक एस.वाय. खरात (सर) यांनी केले. कार्यक्रमास माजी उपसरपंच भिमराव शिंदे, विकास सोसायटीचे माजी संचालक आप्पासाहेब शिंदे,मोहन खरात, दादासाहेब खताळ,ज्योतिराम खोत, फिरोज सनदी,वासिम सनदी,विकास सोसायटीचे माजी संचालक प्रकाश धडस,मिरज पंचायत समिती विस्तार अधिकारी मालती शा. खरात,संपदा खोत,सुलभाताई गुरव,ग्रामपंचायत सदस्या सुशीला आ.खोत,कळंबीचे पोलीस पाटील मन्सूर नदाफ,आरग येथील बी.आर.पाटील आदी पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!