आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवीच्या गौरी खेळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले  जात आहेत. पालकांसाठी गौरीचे खेळ स्पर्धा*. शनिवार ,दिनांक ७/१०/२०२३ रोजी या गौरीचे खेळ स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये शाळेच्या महिला पालक वर्गाने उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. एकूण १०, महिला ग्रुप यामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी आपली नृत्ये, मंगळागौर खेळ उत्तम व सुंदर प्रकारे सादर केले. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भिलवडी गावच्या सौ. उमा कोरे मॅडम यांना आमंत्रित केले होते.

तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या आधारस्तंभ सौ. लिना वहिनी चितळे होत्या. त्याच बरोबर शाळेचे विभाग प्रमुख श्री.के.डी.पाटील सर, खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुकुमार किणीकर सर, सेमी इंग्लिश शाळेचे मुख्याध्यापक श्री.तुषार पवार सर कै.प्रकाश गोसावी बालवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुलकर्णी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे मूल्यमापन करण्यासाठी दोन परीक्षक म्हणून,सौ. अश्विनी गोसावी व सौ.श्रुती गुमास्ते यांनी काम पाहिले. परिक्षणाचे काम त्यांनी उत्तमरीत्या पार पाडले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व महिला पालकांना घर संसारातून वेळ काढून आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देता आला. सर्व महिला पालकांनी मोठ्या उत्साहात आपले खेळ सादर केले. सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह व आनंद दिसून येत होता. या स्पर्धेतील विजेता ग्रुप पुढीलप्रमाणे – 1. कन्यारत्न ग्रुप (प्रथम क्रमांक ) 2. स्वयंसिद्धा ग्रुप (द्वितीय क्रमांक) 3. विघ्नहर्ता ग्रुप (तृतीय क्रमांक) सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या वतीने बक्षिस देऊन सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले. त्याच प्रमाणे स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आल्या.अशा प्रकारे मोठ्या आनंदात व उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मंजुषा शिंदे यांनी केले व आभार सौ. उज्वला हजारे यांनी मानले. तसेच कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सौ. पूनम कदम यांनी केले. या स्पर्धेच्या पूर्तीसाठी शाळेतील सौ.मिनाक्षी चौगुले, सौ.हर्षला पवार – पाटील, सौ.किर्ती चोपडे, दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग होता.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!