महाराष्ट्र

इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था शाखा पलूसचा चा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सभासदांच्या खातेदारांच्या हिताकरिता सदैव कटिबद्ध : चेअरमन संग्राम दादा पाटील

पलूस :- इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर शाखा पलूस चा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी संस्थेचे चेअरमन संग्राम दादा पाटील, व्हाईस चेअरमन अधिक चव्हाण ,माजी चेअरमन युवराज  सूर्यवंशी, राजारामबापू पाटील,सतीश आबा पाटील, क्रांती कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिगंबर दादा पाटील,संचालक मोहनराव शिंदे, अमर इनामदार, डॉ. पृथ्वीराज पाटील,बळीराम भोसले, धनाजीराव शेंडगे, शशिकांत पाटील, दिलीप येसुगडे, सोमनाथ होमकर ,अशोक जाधव,रंगराव जाधव,सतीश पाटील, विजय पाटील,एडवोकेट सतीश चौगुले ,अमर शिसाळ, अख्तर पिरजादे ,महादेव देसाई ,रमेश कदम, मन्सूर मुजावर,सुनील सावंत ,रवींद्र आरबुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम कटारे ,शाखाधिकारी चंद्रदीप पाटील ,बी आर पाटील , पैलवान नारायण साळुंखे यांच्या सह सर्व हितचिंतक खातेदार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना चेअरमन संग्राम दादा पाटील म्हणाले, इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप तात्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व सभासदांचे हित जोपासले जाईल. त्यांच्या असणाऱ्या ठेवी सुरक्षितपणे राहतील याबाबत काळजी करण्याचे कारण नाही. या आर्थिक वर्षांत 251 कोटी रुपयांच्या व्यवसायाकडे संस्थेची वाटचाल आपण करत आहोत. भविष्यात खातेदारांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहे. कडेगाव, विटा, कासेगाव येथे शाखा विस्तार होणार आहे.

माजी चेअरमन युवराज सूर्यवंशी म्हणाले, दिलीप तात्या पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासण्याकरिता या संस्थेची स्थापना केली. यावेळी सतीश आबा पाटील, अमर भाऊ इनामदार, एडवोकेट सतीश चौगुले यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेला शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सल्लागार अख्तर पिरजादे यांनी स्वागत केले .प्रास्ताविक भाषण संग्राम दादा पाटील यांनी केले तर आभार  संस्थेचे व्हाईस चेअरमन अधिक चव्हाण यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!