महाराष्ट्र

भिलवडी पोलिस ठाण्यासह विविध ठिकाणी ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा

 

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाणे येथे
भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या हस्ते १५ आॅगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस बांधवांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.त्यानंतर
भिलवडी ग्रामपंचायत प्रांगणात सरपंच विद्याताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गावातील प्रमुख नेतेमंडळी, ग्रामस्थ, आजी माजी सैनिक विविध संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांच्या उपस्थितीमध्ये सामुदायिक राष्ट्रगीत झाले. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या बाल विद्यार्थ्यांनी देशाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर माजी सैनिक कार्यालयाजवळील शिलालेखाचे अनावरण माजी सैनिक उत्तम कांबळे भोई व सरपंच विद्याताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी भिलवडी ग्रामपंचायत वतीने जि.प.शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

भिलवडी येथे राष्ट्रगीताचा स्तुत्य असा उपक्रम सुरू होऊन झालेली तीन वर्षे व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या पार्श्वभूमीवर
सर्व भिलवडीकरांनी भारतीय स्वातंत्र्य दिन उत्स्फूर्तपणे आणि अभिमानाने साजरा केला.
भिलवडीत दररोज सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रगीत होते.१५ आॅगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सर्व भिलवडीकरांनी एकत्रितपणे राष्ट्रगीताचा जनजागर केला.तब्बल एक किलोमीटर लांबीच्या राष्ट्रध्वजाच्या साक्षीने भिलवडीकरांनी राष्ट्रगीत गायलं. यामध्ये भिलवडी ग्रामपंचायतचे सदस्य, प्रवासी वाहतूक संघटना, चॅलेंजर्स ग्रुप, आजी-माजी सैनिक संघटना, विजयंता ग्रुप, पत्रकार संघटना, आशासेविका, व्यापारी संघटना, प्रहार अपंग क्रांती संघटना, दत्तनगरचा राजा गणेश मंडळाचे पदाधिकारी, व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!