महाराष्ट्र

मिरज सुधार समितीचं कार्य कौतुकास्पद : उद्योगपती सी.आर सांगलीकर

 

मिरज प्रतिनिधी :- व्हिजन जर ठेवायचे असेल तर आपल्या कामाचा ड्राफ्ट असायला पाहिजे.ड्राफ्टनुसार काम करावं लागेल.ड्राफ्टमुळे कोणते काम कधी करायचं आहे ते समजेल.असे मत मा.उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांनी मिरज शहर सुधार समितीच्यावतीने आयोजित केलेल्या १५ आॕगस्ट स्वतंत्रता दिवसाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
तसेच आपल्या सुधार समितीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील रिटायर्ड अधिकारी यांना सामावून घेऊन त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेतला पाहिजे.सुधार समितीने आत्ता फक्त रस्ते आणि गटारी या प्रश्नात अडकून पडु नये.या समस्या सोडुन ही इतरही खूप महत्त्वाच्या समस्या आहेत.त्याही सोडवल्या पाहिजेत तसेच आपण सर्वांनी व्हिजन असनारे लोक प्रतिनिधी निवडून दिले पाहिजे.जिल्ह्याला एकच सुधार समिती असावी त्यांच्या अंतर्गत सर्वांनी काम करावे.असे मत व्यक्त केले.
यावेळी सुधार समितीच्या इतर मान्यवरांनी ही आपली मनोगते व्यक्त केली.


यावेळी सुधार समितीचे अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, कार्यवाह जहीर मुजावर, उपाध्यक्ष राकेश तामगांवे, संतोष जेडगे, अक्षय वाघमारे, शकील पीरजादे, डॉ. नईम मनेर, हनिफ ताशीलदार, रामलिंग गुगरी, श्रीकांत महाजन, शाहिद पीरजादे, जावेद शरिकमसलत, गुरूराज परदेशी, राजेंद्र झेंडे, वसीम सय्यद, सलीम खतीब, जीवन वाघमारे, अहमद ढालइत, भारत कुंजीरे, नासिर घोडीमार, सौ. गीतांजली पाटील, सौ. सुनीता कोकाटे आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!