महाराष्ट्र

पलूस महसूल सप्ताहाची सांगता : पलूस तहसील समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी स्नेहल किसवे यांची उपस्थित

 

पलूस : पलूस तहसील कार्यालयामध्ये एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला होता. शासन आदेशानुसार महसूल दिनापासून आठवडाभर महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वसामान्य नागरिकां च्या कामानिमित्त रामानंदनगर येथे समाधान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .तसेच माजी सैनिक आजी सैनिक स्वातंत्र सैनिक यांचा मेळावा , कार्डवाटप, शिधापत्रिका वाटप ,संजय गांधी निराधार योजनेच्या मंजुरीचे प्रमाणपत्रे ,आधार कार्ड वाटप, मतदान ओळखपत्राचे वाटप , अशा  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रांताधिकारी अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार निवास ढाणे यांनी सुरळीतपणे महसूल सप्ताह चे आयोजन केले. आज महसूल सप्ताहाची सांगता होती .त्यावेळी तहसील कार्यालयाच्या सभागृहात ग्रामीण कथाकार सर्जेराव खरात यांचा ग्रामीण कथा चा बहारदार कार्यक्रम झाला. यावेळी विनोदी चुटके सादर करून हात वारे करून त्यांनी उपस्थिताच्या मध्ये हशा पिकवला .यावेळी समन्वयक म्हणून भूसंपादनच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल किसवे तसेच प्रांताधिकारी अजय शिंदे तहसीलदार निवास ढाणे, नायब तहसीलदार बबन करे, नायब तहसीलदार विकी परदेशी ,यांच्यासह सर्व महसूल चा स्टाफ, मंडल अधिकारी, कोतवाल, तलाठी उपस्थित होते .यावेळी उप जिल्हाधिकारी स्नेहल किसवे प्रांताधिकारी अजय शिंदे, तहसीलदार निवास ढाणे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रास्ताविक नायब तहसीलदार बबन करे यांनी केले तर आभार गौस लांडगे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!