महाराष्ट्र

बेडग गाव बंद असल्याने आंबेडकरी बांधवांना गौरवाड बौद्ध समाजाकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत

मिरज : सांगली जिल्ह्यात बेडग ता. मिरज हे गाव बंद असल्याने सामाजिक बहिष्कार पाहता, समाजबांधवांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून
गौरवाड गाव ता.शिरोळ जिल्हा कोल्हापूर येतील बौद्ध समाज तसेच सिद्धार्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गौरवाड यांनी समाजातून आर्थिक साहाय्य गोळा करून, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका मधील बेडग गावातील बांधवांसाठी नऊ पोती कोबी, कोथंबीर, पालक, पावटा, इत्यादी जीवनावश्यक भाज्या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून घेऊन आले.

यावेळी मोहन भोसले, भरत शेडबाळे, विशाल निंबाळकर, महेंद्र कांबळे, अमित कांबळे, सुनील भोसले तसेच सिद्धार्थ तरुण मंडळ व समस्त बौध्द समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील भोसले म्हणाले की सामाजिक बहिष्कार हे पाहताच आम्हाला खूप दुःख झाले, असे आपली माणसं संघर्ष करणाऱ्यांना एकटे पडू देत नाहीत. बेडग येतील समाज बांधवांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कायदेशीर ठराव मंजूर करून उभारण्यात येत असलेली कमान दिशाभूल करून पाडली आहे. त्या दोषींवर अट्रॉसिटी ॲक्ट कायदेनुसार गुन्हा नोंद झाला आहे. संविधानीक लढाई जिंकली आहे. समाज बांधवांनी न्याय हक्कासाठी काढलेल्या लॉंग मार्चला यश आले आहे. हि लढाई कोणत्याही जाती धर्माचा विरोधात नसून कायदेशीर धोरणानुसार होती.तसेच कोणत्याही शासकीय आदेश पारित न करता कमान पाडण्यासाठी मदत करणारे प्रशासन अधिकारी यांना सआरोपी करून व दोषी असणारे यांच्या वर संविधान निर्मात्यांच्या नावाची असणारी कमान पाडली आहे त्या कमानीची विटंबना केली आहे.त्यामुळे त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट कायदेनुसार गुन्हा बरोबरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!