महाराष्ट्रआरोग्य व शिक्षण

मिरज तालुक्यातील नांद्रे विद्यालय नांद्रे येथे निर्भया पथकाचे विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन ; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

नांद्रे प्रतिनिधी ;- मिरज निर्भया पथकाच्या वतीने मिरज तालुक्यातील नांद्रे विद्यालय नांद्रे येथे विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सांगली जिल्हा पोलिस दलातर्फे महिला छेडछाडीस प्रतिबंध करण्यासाठी निर्भया पथक स्थापन करण्यत येते.
यावेळी या पथकाच्या सदस्या तपस्या खोत व कांबळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यात महिलांची कशाप्रकारे छेडछाड केली जाते, छेडछाड करणाऱ्यावर कायद्यांतर्गत विविध कलमान्वये कशी कारवाई केली जाते.याविषयी माहिती दिली. पाठलाग करणे , सोशियल मीडियाद्वारे त्रास देणे , अश्लील बोलणे, शिवीगाळ करणे, लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, अशा छेडछाडीच्या विविध प्रकाराविषयी त्यांनी माहिती दिली.


विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आडमुठे सर यांनी निर्भया पथकातील सर्व सदस्यांचे स्वागत केले व आभार मानले.
या कार्यक्रमा वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आडमुठे सर पर्यवेक्षक श्री पाटील सर व इतर सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!