क्रीडा

शौर्य बगाङिया”अंशूमन”, शंतनूला अजिंक्यपद ; अनयाज चेस शालेय बूद्धीबळ स्पर्धा

 

 

 

कोल्हापूरहून”” दर्पण न्यूजसाठी अनिल  पाटील :

चंदवाणी हॉल,ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे गेली दोन दिवस सुरू असलेल्या व अनयाज चेस क्लब ने आयोजित केलेल्या नऊ,बारा व पंधरा वर्षाखालील शालेय मुलांच्या शास्त्रीय सराव बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या .नऊ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम सहाव्या फेरीत पाच गुणासह आघाडीवर असलेल्या अग्रमानांकित संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या शौर्य बगडिया श्रद्धा ओलंपियाड स्कूलच्या वेदांत बांगड वर विजय मिळवत सहापैकी सहा गुण मिळवून अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपद पटकाविले. द्वितीय मानांकित न्यू हायस्कूलच्या अर्णव हरीश पाटीलने सृजन आनंद विद्यालयाच्या श्रीहर्ष रानडे वर मात करीत पाच गुणांसह उपविजेतेपद पटकाविले तर तिसऱ्या पटावर तृतीय मानांकित सेंट पॉल्स स्कूल,अतिग्रे च्या आदित्य ठाकूरने व्यंकटेश्वरा इंग्लिश स्कूल च्या रौनक झंवर चा पराभव करून पाच गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.बारा वर्षाखालील मुलांच्या गटात सहाव्या फेरीत चुरशीने झालेल्या लढतीत पहिल्या पटावर पाच गुणासह आघाडीवर असलेल्या छत्रपती शाहू विद्यालयाच्या अंशुमन शेवडेला कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या राजदीप पाटील ने पराभवाचा धक्का दिला.दोघांचे समान पाच गुण झाल्यामुळे सरस बकोल्झ् टायब्रेक गुणानुसार अंशुमन ने अजिंक्यपद ला गवसणी घातली तर राजदीप ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दुसऱ्या पटावर अग्रमानांकित पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या अरिना मोदी ला तात्यासाहेब मुसळे स्कूलच्या अथर्व तावरे ने बरोबरीत रोखल्यामुळे अरिना ला साडेचार गुणांसह तृतीय स्थानावर संतुष्ट व्हावे लागले.पंधरा वर्षाखालील गटात अंतिम सहाव्या फेरीत पहिल्या पटावर अग्रमानांकित विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलच्या शंतनू पाटील व तृतीय मानांकित सेवंथ डे स्कूलच्या महिमा शिर्के यांच्यातील डाव बरोबरीत सुटला दोघांचे समान साडेपाच गुण झाले सरस बकोल्झ् टायब्रेक गुणामुळे शंतनूला अजिंक्यपद मिळाले तर महिमाला उपविजेतेपदावर समाधानी व्हावे लागले. पाचवा मानांकित न्यू स्कूलचा नारायण पाटील ने सेंट पॉल्स स्कूलच्या अपूर्व ठाकूर ला पराभूत करून तृतीय स्थान मिळविले.
तिन्ही गटातील विजेत्यांना रोख बाराशे रुपये व चषक उपविजेत्यांना रोख एक हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांक ला रोख आठशे रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रिसाईज हायस्पीड स्पिंडल सर्विस सेंटरचे मनीष देशपांडे,माधव होमिओपॅथिक क्लिनिकचे डॉक्टर संतोष रानडे,रोटरी क्लब कागलच्या अध्यक्षा दीपा देशपांडे, चंदवाणी हॉल ट्रस्टच्या चेअरमन विजया पामनाणी व संगीत आणी गायन क्षेत्रातील जाणकार मुकुंद मारुलकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले , प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे व वरीष्ठ राष्ट्रीय पंच आरती मोदी उपस्थित होते.मुख्य स्पर्धा संयोजक मनीष मारुलकर यांनी सर्वांचे आभार मानले.

 

 


इतर बक्षीस विजेते पुढील प्रमाणे

नऊ वर्षाखालील गट

रौनक झंवर (व्यंकटेश्वरा इंग्लिश स्कूल इचलकरंजी)””
वेदांत बांगड (श्रद्धा ओलंपियाड स्कूल,इचलकरंजी)””
श्रीहर्ष रानडे (सृजनआनंद विद्यालय)””
त्रप्ती सरथा (कोल्हापूर पब्लिक स्कूल)

उत्तेजनार्थ बक्षीस

आदित्य कट्टीमणी (सेवंथ डेज् स्कूल)”
दिविज कत्रुट (शांतीनिकेतन स्कूल)””
आदित्य घाटे (राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल)

उत्कृष्ट बिगरगुणांकित

हर्षित लाड (विबग्योर)””
अथर्वराज ढोले (पोदार इंटरनॅशनल स्कूल)””
अद्वैत पाटील (पोदार इंटरनॅशनल स्कूल)

उत्कृष्ट मुली

सांची चौधरी (डिकेेटीई इंटरनॅशनल स्कूल)”
राजेश्वरी मुळे (वसंतराव देशमुख हायस्कूल)””
दिवीजा माने (महावीर इंग्लिश स्कूल)

उत्कृष्ट शाळा

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल,अतिग्रे””
पोदार इंटरनॅशनल स्कूल,कोल्हापूर””
न्यू हायस्कूल,कोल्हापूर

बारा वर्षाखालील गट

अथर्व तावरे (तात्यासाहेब मुसळे स्कूल इचलकरंजी)””
आराध्य ठाकूरदेसाई (गंगामाई विद्यामंदिर इचलकरंजी)””
प्रथमेश व्यापारी (साई इंग्लीश मेडियम स्कूल)””
प्रेम गंगाराम निचल (रानडे विद्यामंदिर,सेनापती कापशी)

उत्तेजनार्थ बक्षीसे

सिद्धार्थ चौगुले (कोल्हापूर पब्लिक स्कूल)””
आरुष ठोंबरे (व्ही जे पाटील पब्लिक स्कूल)””
श्रवण ठोंबरे (व्ही जे पाटील पब्लिक स्कूल)

उत्कृष्ट बिगरगुणांकित

सर्वेश पोतदार (प्रायव्हेट हायस्कूल)””
अर्णव रहाटवळ (विमला गोइंका इंग्लिश मीडियम स्कूल)””
अंशुल चुवेकर (सेंट झेव्हियर स्कूल)

उत्कृष्ट मुली

सिद्धी कर्वे (जनता विद्यामंदिर जयसिंगपूर)””
स्वरा हिरुगडे (महात्मा गांधी विद्यालय आष्टा)””
मुक्ता कट्टी (वसंतराव देशमुख हायस्कूल)

उत्कृष्ट शाळा

कोल्हापूर पब्लिक स्कूल, कोल्हापूर””
व्ही.जे. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, पाचगाव””
वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूल, कोल्हापूर

पंधरा वर्षाखालील गट

व्यंकटेश खाडे पाटील (सेवंथ डेज स्कूल)””
हित बलदवा (पोदार इंटरनॅशनल स्कूल,सांगली)””
आरव धनंजय पाटील (शांती निकेतन स्कूल)””
अथर्व जखोटिया (पोदार इंटरनॅशनल स्कूल,कोल्हापूर)””

उत्तेजनार्थ बक्षीसे

नितीन परीक (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल)””
अरविंद कुलकर्णी (वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूल)””
शरयू साळुंखे (प्रायव्हेट हायस्कूल)

उत्कृष्ट बिगरगुणांकित

सोहम कोटकर (वसंतराव देशमुख हायस्कूल)””
अपूर्व ठाकूर (सेंट पॉल्स स्कूल,अतिग्रे)””
पृथ्वीराज माने( छत्रपती शाहू विद्यालय)””

*उत्कृष्ट मुली*

अवनी कुलकर्णी (माईसाहेब बावडेकर स्कूल)””
मन्नत पामनाणी (फोर्ट इंटरनॅशनल स्कूल)””

उत्कृष्ट शाळा

सेवंथ डेज् स्कूल,कोल्हापूर””
चाटे स्कूल शाहूपुरी,कोल्हापूर”
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे”

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!