महाराष्ट्र

धम्म आणि बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणाराच आमच्यासाठी प्रतिष्ठित : मा.उद्योगपती सी आर सांगलीकर

देशिंग ता. कवठे महंकाळ येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा

 

सांगली :-(सचिन इनामदार):-  ज्या माणसाला धम्म समजला आहे,ज्याने बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले आहे तो आमच्यासाठी प्रतिष्ठित आहे असे आम्ही मानतो असे परखड मत उद्योगपती,माननीय सी.आर. सांगलीकर साहेब यांनी त्यांच्याच दान पारमितेतून देशिंग ता. कवठे महंकाळ येथे देण्यात आलेल्या बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.
ग्रामपंचायत,सोसायटीच्या निवडणूकीस उभारणारे आणि पडणार्यांना आपण प्रतिष्ठित मानता का?त्याचं कर्तृत्व काय? असा सवाल उपस्थितांना करत ते म्हणाले राजकीय लोक पाच वर्षे राहतात आणि जातात. मला महीलाच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत.सर्व महिलांनी आपल्या मुलांना घेऊन किमान दर रविवारी तरी आपल्या बुद्ध विहारात यायला पाहिजे. तुम्ही विहारात येवून सुरवातीस त्रिसरणं,पंचशील म्हणावे तुमच्या सह मुलांना याची सवय लागेल.यामुळे आपल्या मध्ये हळूहळू बदल घडेल ते तुम्हाला कळेल.महीलांनी आपल्या मुलांना मुलिंना चांगले शिक्षण द्यावे.तरुणांनी चांगले शिक्षण घेतले पाहिजे.नोकरीच्या मागे न लागता छोटे मोठे उद्योग, व्यवसाय करण्यास सुरुवात केली पाहिजे.तरच तुमच्यात ही माझ्यासारखे अनेक सांगलीकर तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पु.भदंत गोविंदो मानदो (नागपूर),पु. भदंत आर.आनंद व पु.भदंत एस. धम्म सेवक वसगडे,कोल्हापूर यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली मोठ्या दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची संपूर्ण देशिंग गावातून भव्य आणि सुंदर शोभायात्रा काढण्यात आली होती.समरंभाचे प्रमुख वक्ते प्रा.डाॅ.बाळासाहेब कर्पे यांनी मनोगत व्यक्त केले.यानंतर पु.भंतेंनी धम्म देसना दिली.यावेळी सी.आर.सांगलीकर फौंडेशन आणि अथर्व चंद्रकांत सांगलीकर चारिटेबल ट्रस्टच्या बुद्ध मूर्ती दान समितीचे सदस्य अॕड.भारत शिंदे,आयु.आनंदा कांबळे,आयु.अरुण कांबळे,आयु. सचिन इनामदार यांचेसोबत सांगलीकर फौंडेशनचे आयु.प्रदीप कांबळे, महेश शिवशरण, प्रा.संजीव साबळे,प्रा.सर्जेराव नरवाडे,आयु.भारत कदम,आयु.किरण पाटील, सचिन कांबळे, विश्वास मागाडे, रवींद्र खांडेकर, पद्माकर कांबळे हे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.


तसेच या समारंभास गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह पंचक्रोशीतील उपासक,उपासिका,प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.झ
सदर समारंभ यशस्वी करण्यासाठी न्यु झुंजार कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ,न्यु भिमशक्ती प्रतिष्ठान,रमामाता महीला मंडळ,देशिंग यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.समारंभानंतर उपस्थितांना भोजन दान ही देण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!