महाराष्ट्रआरोग्य व शिक्षण

एमसीईडीव्दारे कार्यक्रम आयोजक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 

 

सांगली  : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) सांगली जिल्हा कार्यालयाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा व तालुकास्तरावर करण्यासंदर्भात कार्यक्रम आयोजक म्हणून करार तत्वावर काम करू इच्छिणाऱ्या पदवी-पदवीत्तर पदवी धारकासाठी कार्यक्रम आयोजक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्र युवक युवतींनी 5 जुलै 2023 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन एम.सी.ई.डी. कोल्हापूर चे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले आहे.

या प्रशिक्षणासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील किमान पदवीधर असावा, संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थीना संस्थेमार्फत राबविले जाणारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यक्रम आयोजन व नियोजनाचे तंत्र कार्यक्रम अहवाल तयार करणे, लेखा विषयक माहिती तसेच नियम व अटी याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्यापूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना संस्थेच्या नियमानुसार प्रमाणपत्र व करार पध्दतीने कार्यक्रम आयोजनाचे कार्य करण्याची संधी देण्यात येईल. अधिक माहितीसाठी इच्छुक पात्र युवक, युवतींनी दत्तात्रय क्षीरसागर, प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई.डी. मो. 7057994308 किंवा विनायक मखले, जिल्हा सहाय्यक, एम.सी.ई.डी. जिल्हा कार्यालय व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, टाटा पेट्रोल पंपच्या मागे, विश्रामबाग, सांगली फोन नं. 0233-2671169 येथे दि. 5 जुलै 2023 पर्यंत संपर्क साधावा.

एम.सी.ई.डी. ही महाराष्ट्र शासन व राज्यातील विविध औद्योगिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने अस्तित्वात आली. तसेच राज्याच्या उद्योक विभागाच्या अखत्यारीत उद्योजकता विकास क्षेत्रात कार्य करणारी स्वायत्त संस्था असून संस्थेव्दारे राज्यात उद्योजकतेविषयी पोषक वातावरण निर्मिती करणे, शास्त्रशुध्दरित्या उद्योजकतेचे ज्ञान, कौशल्य वाढवून उद्योजकतेची मानसिकता निर्माण करण्याचे कार्य विविध प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हास्तरावरून केले जाते. याच उद्देशाने कार्यक्रम आयोजक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री. थोटे यांनी कळविले आहे.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!