महाराष्ट्र

बार्टी तर्फे संविधान दिंडीच्या माध्यमातून महाराष्ट्राभर संविधानाचा जागर:: कामगार मंत्री मा सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत ‘बार्टी संविधान दिंडीचा ‘ समारोप

सांगली :-  आषाढी एकादशी दिनी पंढरपूर येथे बार्टी चे संविधान दिंडीचा समारोप राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.सुरेश खाडे यांचे हस्ते व विशेष उपस्थिती म्हणून श्री.मोहन  वनखंडे,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा संघटना मंत्री यांचे उपस्थिती मध्ये पर पडले
यावेळी सांगली चे पालकमंत्री श्री.सुरेशभाऊ खाडे यांनी सामाजिक न्याय विभाग व बार्टी संस्थेने उत्कृष्ट उपक्रम नियोजित केले बाबत बार्टीच्या महासंचालक श्री.सुनील वारे व समतादूत विभागाचे विशेष कौतुक  केले.असे उपक्रम भविष्यात देखील हाती घ्यावे असे बार्टी संस्थेस सूचित केले.
सचिव,श्री.सुमंतजी भांगे ( सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन ) यांच्या मुख्य संकल्पनेतुन व आयुक्त,डॉ. प्रशांतजी नारनवरे (समाज कल्याण पुणे) व महासंचालक श्री. सुनील वारे (बार्टी) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे यांचेमार्फत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या बरोबर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या “संविधान दिंडी” चे आळंदी ते पंढरपूर आयोजन करण्यात आले होती.
महाराष्ट्रातील आराध्य दैवत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान  आषाढी वारीस दिनांक ११ जून पासून सुरुवात झाली होती.यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून  दिंड्या दाखल होत्या.
बार्टीकडून पालखी सोहळ्यात संविधान दिंडीच्या माध्यमातून संविधान विषयांवर तसेच संत महापुरुष विचारांवर जनजागृती करण्यात आली.यावेळी ‘बार्टी’ कडून संविधान विषयक प्रबोधन करण्यासाठी “संविधान रथ” सजवुन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
     संविधान दिंडीचा समारोप करण्याकरिता माननीय कामगार मंत्री, मा.श्री.सुरेशभाऊ खाडे साहेब यांचे स्वागत बार्टी प्रतिनिधी श्रीम.नसरीन तांबोळी सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक समतादूत विभाग यांच्या वतीने करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरी निर्माते प्रबोधनसम्राट सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधन कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली.
     सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी,प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे,प्रकल्प अधिकारी श्री.विजय बेदरकर अकोला जिल्हा प्रकल्प अधिकारी व सोलापूर समतादूत इ.समावेश होता.
   समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टी सहा.प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती नसरीन तांबोळी,सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी विजय पी.बेदरकर तसेच आभार प्रदर्शन समतादूत श्रीमती राजश्री कांबळे यांनी मानले ले.
Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!