महाराष्ट्र

बार्टीच्या संविधान दिंडीला पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या शुभेच्छा

 

        सांगली, : – डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्यामार्फत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर यावर्षीही “संविधान दिंडी” चे आयोजन करण्यात आले आहे. हा सुंदर आणि अत्यंत महत्वाचा स्तुत्य उपक्रम बार्टी संस्था करीत आहे. याकिरता पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे व बार्टीचे महासंचालक सुनील वारे व समतादूत प्रकल्प टीमचे अभिनंदन करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. असे उपक्रम भविष्यात नियोजित करावेत, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

            आषाढी वारी ‍निमित्त वारकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत असून गेल्या १५ दिवसांपासून  वातावरण भक्तिमय झाले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. वारकरी बांधवांना भारतीय संविधानाची माहिती व्हावी, आपले मूलभूत अधिकार, कर्तव्याची जाणीव व्हावी तसेच संतांच्या समतावादी विचारांचा प्रसार व्हावा हा या संविधान दिंडीचा हेतू आहे. वारकरी बांधवांना चालता बोलता संविधान प्रश्नमंजुषा, प्रबोधनातून, गीताच्या कार्यक्रमातून, शाहिरी या माध्यमातून भारतीय संविधानाची माहिती देण्यात येत आहे व वारकरी बांधवांना भारतीय संविधानाची प्रत व प्रास्ताविकाचे वाटप करून त्यांना भारतीय संविधानाबद्दल आपल्या मूलभूत अधिकार व कर्तव्याची माहिती देण्यात येत आहे. अशी  माहिती बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!