महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सांगली जिल्हा दौरा

0

सांगली : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात गुरूवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.४५ वा. मुंबई येथून हेलिकॉप्टरने मिरजकडे प्रयाण. सकाळी १०.२० वा. एमआयडीसी कवलापूर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल मिरज कडे प्रयाण. सकाळी १०.५० वाजता गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल मिरज येथे आगमन व राखीव. सकाळी ११ वा. गुलाबराव पाटील मेमोरीयल ट्रस्ट संस्थेचा रौप्य महोत्सवी सांगता समारंभास उपस्थिती, स्थळ – गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल मिरज. दुपारी १.३० वा. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल मिरज येथून कवलापूर हेलिपॅडकडे प्रयाण.दुपारी २ वा. कवलापूर हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने जत कडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. राजेरामराव महाविद्यालय जत हेलिपॅड येथे आगमन राजेराम महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता व सुवर्ण स्मृती स्मरणिका प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ – राजेरामराव महाविद्यालय जत. दुपारी 3.30 वा. राजे रामराव महाविद्यालय जत येथून गांधी सर्कल जतकडे प्रयाण. दुपारी 3.35 वा जत तालुका काँग्रेस कमिटी आयोजित सत्कार समारंभास उपस्थिती, स्थळ – गांधी सर्कल जत. दुपारी 4.35 वा. गांधी सर्कल जत येथून हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 4.45 वा. जत हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने पलूसकडे प्रयाण. सायंकाळी 5.15 वा. कृष्णा वेरळा मागासवर्गीय सुतगिरणी, पलूस येथील हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने अंकलखोप, ता. पलूसकडे प्रयाण. सायंकाळी 5.45 वा. आगमन व भारती विद्यापीठाच्या हुतात्मा भगतसिंग हायस्कूलच्या इमारत उद्घाटन समारंभास उपस्थिती, स्थळ – भारती विद्यापीठाचे हुतात्मा भगतसिंग हायस्कूल, अंकलखोप, ता. पलूस. सायंकाळी 7 वा. अंकलखोप येथून कडेगावकडे प्रयाण. रात्री 8.30 वा. कडेगाव येथे आगमन व मुक्काम.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये