महाराष्ट्र

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येणार  

 

        सांगली  :  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिन दिनांक 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण सांगली कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, जुना बुधगाव रोड, सांगली येथे दिनांक 26 जून 2023 रोजी  सकाळी  11 वाजता आयोजित केला आहे. अशी माहिती समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी दिली.

            या कार्यक्रमांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या व थोर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्याविषयी जयवंत आवटे, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, जेष्ठ कथाकथनकार व प्रसिध्द लेखक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सांगली जिल्ह्यातील सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व नागरिकांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण सांगली कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. चाचरकर यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!