जी.डी.सी.ॲण्ड ए व सी.एच.एम. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 16 मार्च पर्यंत

0

सांगली : शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी.ॲण्ड ए बोर्ड) कडून घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲण्ड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा सांगली केंद्रावर दिनांक 22, 23 व 24 मे 2020 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षार्थीकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असून अर्ज भरण्याची मुदत दि. 15 फेब्रुवारी ते 16 मार्च 2020 आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी दिली.
ऑनलाईन अर्जा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्याबाबतच्या सविस्तर सूचना https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. परीक्षेस नव्याने बसू इच्छिणाऱ्या तसेच पूर्वी परीक्षेस बसलेल्या परंतु अनुत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना बसता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत 2 रा मजला, सांगली मिरज रोड विजयनगर, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करे यांनी केले आहे.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये