भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजनेंतर्गत महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास 29 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

0

सांगली : भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेंतर्गत महाडिबीटी पोर्टलवरील ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याण सांगली चे सहायक आयुक्त अर्जुन बन्ने यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित अशा विद्यालय, महाविद्यालय अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या व या योजनेस पात्र असणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनीनी अद्यापही पोर्टलवर अर्ज भरला नसल्यास तसेच ज्या विद्यार्थ्यांचा अर्ज विद्यार्थीस्तरावर प्रलंबित आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर परिपूर्ण अर्ज भरून महाविद्यालयस्तरावर पाठवावेत. संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास सहाय्य करावे व एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही श्री. बन्ने यांनी केले आहे.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये