‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीसाठी सामान्यातील सामान्यांच्या समस्या सोडवाव्यात : राजू शेट्टी

0

भिलवडी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीसाठी सामान्यातील सामान्यांच्या समस्या सोडवाव्यात. पदाधिकारी किंवा कार्यकर्ता मोठा नसून पक्ष, स्वाभिमानी संघटना मोठी आहे, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी औंदुबर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना अभ्यास शिबिर आणि पदाधिकारी निवड कार्यक्रमात केले.

औदुंबर येथे सांगली जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना अभ्यास शिबीर व पदाधिकारी निवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे पदाधिकारी संदीप राजोबा, सांगली जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जिल्हा परिषद सदस्य सूर्य गंधा आडमुठे, अशोक शिंदे, वैभव कांबळे, प्रकाश पोकळे, सावकार नाईक, जालिंदर पाटील आदी सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

स्वागत संदीप राजोबा यांनी केले. प्रास्ताविक संजय बेले यांनी केले.

शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या दमाने आजपर्यत काम करत आले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रकारचे आंदोलन छेडले आहेत. या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्त्यावर केसेस आहेत तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता पदाधिकारी मागे हटला नाही. अभ्यास शिबिरासाठी औदुंबर क्षेत्र निवडणे. यामागे मोठा उद्देश आहे. याठिकाणी अनेक नेत्यांनी एकत्रित करण्याचा आणि आणण्याचा प्रयत्न केला. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी येणारे जिल्हा परिषद आणि आमदार की डोळ्यासमोर ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभासद नोंदणी करावी. संघटनेला शिस्त लावावी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी विचाराशी ठाम राहावे, चळवळीचे हित डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने कार्य करावे. फेसबुक आणि व्हाट्सअप वर कोणीही एखाद्या कार्यकर्त्याची बदनामी करू नये,हे संघटनेला बाधीकारक असते, त्याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

या अभ्यास शिबिरामध्ये सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रत्येक तालुका व संघटनेच्या पदाधिकार्‍यांची निवड झाली. त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या अभ्यास शिबिराने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला दिसला. संदीप राजोबा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अभ्यास शिबिराचे चांगले नियोजन केले.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये