उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन

0

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आम आदमी पक्षाच्या विजयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.

दिल्लीची जनता विकासाच्या बाजूने उभी राहिली असून दिल्लीच्या जनतेने आम आदमी पक्षाला आणि अरविंद केजरीवाल यांना जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. यापुढील काळातही श्री. केजरीवाल यांच्याकडून जनतेची सेवा घडेल असा, विश्वास व्यक्त करून त्यांच्या पुढील वाटचालीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये