रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघाच्या चेअरमनपदी सचिन पाटील तर व्हा.चेअरमनपदी शिवाजी देसाई यांची बिनविरोध निवड
कोल्हापूरःअनिल पाटील
रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघाच्या चेअरमनपदी सचिन विश्वासराव पाटील तर व्हा.चेअरमनपदी शिवाजी नाना देसाई यांची एकमताने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती डी.एस.चौगुले (जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्रेणी-१) यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी करणेत आल्या. या चेअरमन पदाच्या निवडीकरीता सुचक म्हणून – श्री. नेमगोंडा पाटील व अनुमोदक म्हणून – श्री. चिंतामण गुरव व व्हा.चेअरमन पदी शिवाजी देसाई यांना सुचक म्हणून – सौ. माधुरी उदयराव जाधव व अनुमोदक म्हणून – श्री. कुंडलिक महादेव पाटील आहेत. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. गोकुळचे जेष्ठ संचालक व रयतचे मार्गदर्शक संचालक विश्वास पाटील(आबाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाचे संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे.
नूतन चेअरमन सचिन पाटील बोलताना म्हणाले की संघामार्फत शेतकरी संपर्क सभा, शिबिरे ,मेळावे,पीक स्पर्धा आयोजित करणार असून त्यांना बक्षीस देणे, शेती उपयुक्त साधन सामग्री, आधुनिक अवजारे व इतर शेती पूरक सुविधा पुरवने, शेतीनिष्ठ शेतकऱ्यांना रयत मार्फत पुरस्कार देणे, शैक्षणिक सहलीचे आयोजन यासारखे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे चेअरमन पाटील यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित निवडणूक अधिकारी श्रीमती.डी.एस.चौगुले, गोकुळचे जेष्ठ संचालक व रयतचे मार्गदर्शक संचालक विश्वासराव पाटील (आबाजी), नुतन संचालक नेमगोंडा पाटील, चितांमण गुरव,सुभाष चौगले, कुंडलिक पाटील, विलास पाटील, संभाजी भोसले, दिंगबर बाटे, विश्वास पाटील-आमशीकर , मारुती मोरे, दत्तात्रय हराळे, संचालिका सौ.माधुरी जाधव, सौ.निर्मला निगडे, व्यवस्थापक तानाजी निगडे,बोर्ड सेक्रेटरी अरविंद देसाई, व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.