महाराष्ट्रक्रीडा

अ‍ामदार गोपीचंद पडळकर यांच्या सन्मानार्थ भिलवडी येथे 13 मे रोजी आमदार चषक भव्य बैलगाडी शर्यतींचे आयोजन : युवक नेते ऋषी टकले यांची माहिती

भिलवडी: राज्यात बंद असलेल्या बैलगाडी शर्यती सुरु व्हाव्यात यासाठि राज्य शासन केंद्र सरकार व न्यायालयीन पातळीवर ताकदिने प्रयत्न करणारे युवा हृदय सम्राट भाजपचे नेते अ‍ामदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या सन्मानार्थ भिलवडीत 13 मे रोजी आमदार चषक भव्य बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवक नेते ऋषी टकले यांनी पत्रकार परीषदेत दिली.
भिलवडी मिठारकी म्हसोबा पट्टा येथे शनिवार 13 मे रोजी दुपारी 2 वाजता मा ऋषी भैय्या टकले युवा शक्ती सांगली जिल्हा यांच्यावतीने या आमदार चषक भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीचे अौचित्य साधुन याठिकाणीच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ५०० जणांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे.
या शर्यतीचे संपुर्ण ड्रोन चित्रिकरण करण्यात येणार आहे. स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. मोठ्या स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागी सर्व बैलगाडी चालक‍ांना सुरक्षेसाठि हेलमेटसह सुरक्षा साधणे पुरवण्यात येणार आहेत.
जनरल बैलगाडी शर्गतीत विजेत्यास 100000 रुपये व चषक
उपविजेत्यास 75000 रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास 50000 रुपये व चषक देण्यात येणार आहे.


ब गटातील बैलगाडी शर्यतीसाठि प्रथम तीन क्रमांकाना 50000, 30000, 20000 रुपये रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे. तसेच आदत व दुस्सा बैलगाडी शर्यतीमधील विजेत्यांना 11000, 7000, 5000 रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे.
यासोबतच दोन गटात घोडागाडी शर्यत होणार आहे. यातील विजेत्यांना 21000 , 15000, 10000 रुपये रोख रक्कम व चषक देण्यात येणार असल्याची माहितीहि ऋषी भैय्या टकले यांनी दिली.
मैदानाची तयारी सुरु आहे पलुस तालुक्यात प्रथमच ईतक्या मोठ्या स्वरुपात भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन होत असल्याने शर्यती यशस्वी होण्यासाठि मा ऋषी भैय्या युवाशक्तीचे 500 कार्यकर्ते जोमाने कामात आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!