आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत रंगला खेळ पैठणीचा

भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन

 

*भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी यांच्या वतीने खास महिला पालकांसाठी* *आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमास उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला.सौ. विजया हणमंत पाटील या माता पालक होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या विजेत्या ठरल्या.*

*सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सौ.रुपाली वाळवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व उद्योजिका सौ.अनघा चितळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.*

*हास्ययात्राकार शरद जाधव यांच्या खुमासदार शैलीतील विनोद व संचलानाने कार्यक्रमात रंगत आणली.*

*प्रथम सौ. विजया हणमंत पाटील( पैठणी सौजन्य – सरगम क्लॉथ सेंटर भिलवडी)*

*द्वितीय – सौ.पूजा श्रीकांत चव्हाण(पैठणी – राज वस्त्रम भिलवडी),*

*तृतीय – सौ.पूजा मोहन पाचुंदे(सोन्याची नथ-गणंजय ज्वेलर्स भिलवडी)*

*चतुर्थ – गीता गजानन निलजकर(सोन्याची नथ – अमित ज्वेलर्स भिलवडी)*

*पाचवा -सौ.तेजस्विनी दत्तात्रय रामचंद्रे(चांदीचे नाणे – सरगम ज्वेलर्स भिलवडी)*

*सहावा – सौ.शोभा तुकाराम माने(लेमन सेट- लकी गिफ्ट अँड मोबाईल शॉपी भिलवडी)*

*सातवा – सौ. वर्षा महादेव वावरे(लेमन सेट- कृष्णानगर कला,क्रीडा व शिक्षण मंडळ माळवाडी)*

*मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.सौ. संध्याराणी मोरे यांनी आभार मानले.*

*या कार्यक्रमास सरपंच सौ.विद्या पाटील,भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके,प्राथमिक विभाग प्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील,ग्रामपंचायत सदस्या सौ.सीमा शेटे,सौ.रुपाली कांबळे,सौ.स्वप्नाली रांजणे, जायंटस सहेलीच्या उपाध्यक्षा सौ.स्मिता वाळवेकर,सौ.अर्चना किणीकर,सौ.प्रगती पाटील,सौ.प्रिया वाळवेकर,सौ.प्राजक्ता कुलकर्णी आदी मान्यवरांसह महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.*

*शिक्षक स्टाफ ने केले कुशल व नेटके संयोजन…*

*प्रगती भोसले,विठ्ठल खुटाण,अर्चना येसुगडे,पूजा गुरव,सारिका कांबळे,प्रियांका आंबोळे,करिश्मा शिकलगार,मेघना शेटे,मंजुषा मोरे,स्वाती भोळे आदींनी महिलांसाठी आयोजित विविध खेळांचे सूत्रसंचालन व संयोजन केले.*

*मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेतील व पाककला स्पर्धेतील(सर्व बक्षिसे सौजन्य – सौ.अर्चना सुकुमार किणीकर) विजेत्या महिलांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!