महाराष्ट्र

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नेमून दिलेले कामकाज वेळेत पार पाडा :  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने विविध कामकाजासाठी  नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेले कामकाज गांभिर्याने विहीत वेळेत व काळजीपूर्वक पार पाडावे. याकामी कोणताही हलगर्जीपणा करू नयेअसे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात नियुक्त केलेल्या विविध पथकांचे नोडल अधिकारी यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटीलउप जिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे,  जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदेमुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाणउपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. 3सविता लष्करेजिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटीलउपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. 9) विजया पांगारकरउपजिल्हाधिकारी (रोहयो) राजीव शिंदेजिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेलउपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ६) स्नेहल कनिचेतहसिलदार अनंत गुरवपोलीस निरीक्षक संतोष डोके आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी  म्हणालेविविध कामकाजासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे. आवश्यक साहित्य, वाहन व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, पोस्टल बॅलेट आदी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी घेवून संबंधिताना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!