महाराष्ट्र

कोल्हापूरात 10 ङिसेंबरला माळी समाजाचा वधूवर पालक मेळावा

 

 


कोल्हापूरः अनिल पाटील

वीरशैव लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्यावतीने रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी समाज व वधू-वर पालक मेळावा होणार आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे सकाळी साडे दहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते तर पुरस्कार वितरण समारंभ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. यावर्षी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले असून यंदाचा जीवनगौरव पुरस्कार सदाशिव बुबणे तर समाजभूषण पुरस्कार युवराज माळी यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वैद्यकीय शिक्षण मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ हे भुषविणार आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्ह्णून खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक जयंत पाटील, वीरशैव बँकेचे अध्यक्ष सदानंद हत्तरगी, बसव केंद्र कोल्हापूरचे अध्यक्ष राजशेखर तंबाखे, डॉक्टर बी. आर. कोरे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!