महाराष्ट्र

शेती क्षारपड मुक्त होण्यासाठी सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांचा मोलाचा वाटा : खासदार संजयकाका पाटील

 

भिलवडी प्रतिनिधी  :-
भिलवडी परिसरातील काही शेती क्षारपड आहे त्यासाठी महाराष्ट्र शासन जलसंपदा यांत्रिकी विभाग सांगली यांच्यामार्फत पहिल्या टप्प्यात नाले रुंदीकरण, खोलीकरण व सफाई करणे हे काम भिलवडी परिसरात सुरू किले होते .तर हे काम पाहिले असता अंतिम टप्प्यात आलेले आहे व काम समाधानकारक आहे असे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी भिलवडी येथे केले ते क्षारपड शेती पाहणी दरम्यान बोलत होते
यावेळी क्षारपड प्रकल्प साठी खासदार संजय काका पाटील यांनी प्रयत्न केले त्यामुळे भिलवडी परिसरातील शेतकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले
यावेळी खासदार संजय काका पाटील म्हणाले क्षारपड शेतीमध्ये सचिद्र पाईप बसवण्याचा सर्वे अंतिम टप्प्यात असून सांगली जिल्ह्यातील सर्वे अंतिम टप्प्यात आहे भिलवडी परिसरातील शेतीमध्ये क्षारपड निर्मूलनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सचिद्र पाइप बसवण्याचे काम लवकरात लवकर सुरू होईल व भिलवडीतील शेतकऱ्यांना क्षारपड जमिनीतून मुक्त करून त्यांचे उत्पन्न वाढेल असे आश्वासन खासदार संजय काका पाटील यांनी दिले आहे
क्षारपड कामासाठी 5 मोठया मशीन्स मार्फत काम सुरू आहे तर नाला सफाई रुंदीकरण व खोलीकरण करणे या सर्व कामाचा खर्च महाराष्ट्र शासन जलसंपदा यांत्रिकी विभाग सांगली यांच्याकडून करण्यात येत आहे

भिलवडी पंचक्रोशी मध्ये कमीत कमी दोन हजार एकर क्षेत्राला याचा फायदा होईल जे क्षेत्र क्षारपड आहे ते क्षारपडमुक्त व्हावे यासाठी भिलवडी परिसरातील शेतकऱ्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्याकडे क्षारपड मुक्त जमिनी व्हाव्या यासाठी मागणी केली होती शेतीचा सर्व विचार करता सुरेंद्र भैय्या वाळवेकर व परिसरातील शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांच्याकडे ही मागणी केली की जर क्षारपड क्षेत्र जर चांगल्या शेतीमध्ये रूपांतर झाले तर शेतकऱ्यांचा सध्या होणारा तोटा होणार नाही व शेतकरी यांना उत्पादन वाढिस हातभार लागेल या सर्व गोष्टीचा विचार करता खासदार संजय काका पाटील यांनी जलसंपदा यांत्रिकी विभाग यांच्याकडून तातडीने या कामाचा पहिला टप्पा सुरू केला व 17 किलोमीटर पैकी 14 किलोमीटर काम पूर्ण झाले असून लवकरच सचिद्र पाईप बसवण्यात येतील
क्षारपड निर्मूलनाचे पहिल्या टप्प्याचे काम सुरू केल्याने खासदार संजय काका पाटील व सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या बद्दल भिलवडी परिसरातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे
चोपडेवाडी ते भिलवडी ,भिलवडी ते कृष्णा नदी भिलवडी ते खंडोबावाडी ,खंडोबावाडी ते बुरुंगवाडी ,बुरुंगवाडी परिसरातील इतर पोटनाले ,ब्राह्मणाळ ते खटाव, खटाव ते भिलवडी स्टेशन या नाल्याचे खोलीकरण रुंदीकरण व गाळ काढणे लवकरच काम सुरू होईल
माजी जि.प. सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर माजी सरपंच विजयकुमार चोपडे ,क्रांतीचे तज्ञ संचालक महावीर उर्फ गुंडा चौगुले माजी प.स.सदस्य राहुल सकळे ,संभाजी महिद,रमेश गणपती पाटील, रवी बापू यादव ,मोहन पाटील सर, संजय हुडुगले ,उल्हास ऐतवडे ,प्रकाश चौगुले ,तानाजी भोई, विनोद वाळवेकर उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!