ताज्या घडामोडी

विनामूल्य पोलिस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली :  : सन २०२०-२१ मध्ये पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत मुस्लिम, ख्रिश्चन, बौध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्यांक समाजातील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामूल्य पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढील अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडून दिनांक ५ एप्रिल २०२१ पर्यंत जिल्हाधिकारी सांगली कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहनध जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- प्रशिक्षणार्थीचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रूपये पेक्षा जास्त नसल्याचा पुरावा (तहसिलदार यांचा दाखला). उमेदवार अल्पसंख्यांक (मुस्लिम, ख्रिश्चन, बौध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू) समाजातील असावा (सक्षम प्राधिकारी यांचा दाखला). उमेदवार हा १८ ते २८ या वयोगटातील असावा. उमेदवाराची उंची पुरूष १६५ सें.मी. व महिला १५५ सें.मी. छाती पुरूष ७९ सें.मी. (फूगवून ८४ सें.मी.) असावी. उमेदवार इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी शैक्षणिक आर्हता, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक राहील. उमेदवार शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा.

उमेदवारांनी वरील कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडून जिल्हाधिकारी सांगली कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. अर्जावर उमेदवार यांचा संपूर्ण पत्ता, ई मेल आयडी, संपर्क क्रमांक / व्हॉटसअप् नंबर नमुद करावा. मूळ कागदपत्रे तसेच उमेदवाराची शारिरीक पात्रता तपासण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close