भिलवडीकरांची रूग्णवाहिकेची समस्या सुटली
14 व्या वित्त आयोगातून भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रास रूग्णवाहिका प्रदान

भिलवडी : चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीमधून भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राला रूग्णवाहिका मिळाल्याने भिलवडीतील नागरिकांची फार दिवसांपासूनची समस्या दूर झाली आहे. रुग्णवाहिका पालकमंत्री नामदार जयंतरावजी पाटील, कृषी-सहकार राज्यमंत्री विश्वजितदादा कदम यांच्या हस्ते भिलवडीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील आणि मान्यवरांनी स्वीकारली आहे.
नेहमीच नवनवीन कल्पना आत्मसात करत भिलवडी येथील काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भिलवडी गावचे हित साधले आहे. गावातील सामान्य माणसाला वेळेत रुग्णवाहिका मिळत नसल्याने हाल होत होते. भिलवडी आणि परिसरातील नागरिकांना रुग्णवाहिका असणारी समस्या दूर करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील यांनी वेळोवेळी सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या कडे पाठपुरावा केला.एकूनच त्यांच्या कार्याला यश मिळाले आहे.
कमी कालावधीत उपसरपंच पृथ्वीराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भिलवडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भिलवडी गावचा विकास झपाट्याने वाढत आहे. या कामाने नागरिकांत समाधान दिसत आहे.
या कार्यक्रमास भिलवडीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील, ग्रा.पं.सदस्य मनोज गुरव, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामदादा पाटील, दक्षिण भाग विकास सोसायटी चेअरमन बाळासाहेब काका मोहिते, माजी उपसरपंच चंद्रकांत भाऊ पाटील, माजी सरपंच शहाजी भाऊ गुरव, बाबासो तात्या मोहिते, माजी उपसरपंच श्रीकांत गायकवाड, भिलवडी व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष जावेद तांबोळी आदी उपस्थित होते.