भिलवडी गावच्या विकासासाठी भरीव निधी देणार : सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम
विविध विकास कामांचा शुभारंभ, सत्कार : लोकांच्या गाठीभेटी आणि सांत्वन

* विकासकामांच्या धडाक्याने माजी मंत्री कै पतंगराव कदम साहेब यांच्या आठवणींना उजाळा
* सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या भेटीने भिलवडी येथील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला
* मंञी विश्वजीत कदम यांच्या संवादमुळे नागरिकांत समाधान
भिलवडी / मुख्य संपादक अभिजीत रांजणे
: कै. डॉ पतंगराव कदम यांच्या संकल्पेतील भिलवडी गावाच्या विकासासाठी आपण भरीव निधी देणार, असे आश्वासन सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिले.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी येथे रविवारी झालेल्या विविध विकासकामांच्या शुभारंभानंतर आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. सकाळपासूनच सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी भिलवडी आणि आसपासच्या परिसरातील लोकांचे सांत्वन केले. भिलवडी येथील स्वामी समर्थ मंदिरात भेट घेऊन तेथे पूजन केले. लक्ष्मी मंदिर शुशोभिकरण, संभो आप्पा मंदिर येथील संरक्षण भिंतीचा शुभारंभ, बांबू लागवड शुभारंभ, नूतन सरपंच, उपसरपंच सत्कार, दिव्यांगांना भेट वस्तू वाटप करण्यात आले.
सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले की कैै.पतंगराव कदम साहेब यांच्या पाठीशी भिलवडीकर नेहमीच खंबीरपणे उभे राहिले. मलाही अधिक मतााधिक्य मिळाले. कमी कालावधीत मला महाराष्ट्र राज्याचे मंंत्रीपदे मिळाली. या पदाच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळात भिलवडीचा विकास करणार आहे.
माझी माय कृष्णा या लोक चळवळीच्या अंतर्गत नदीकाठी बांबूच्या शेताच्या लागवडीचा उपक्रम महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री .डॉ.विश्वजित पतंगराव कदम साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भिलवडी येथे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बांबूचे रोप लावून सुरू केला.
कोरोना काळामध्ये मंञी विश्वजीत कदम यांनी लोकांची केलेली सेवा आणि लोकांना दिलेलाा आधार अनेकांनी अनुभवला होता. याची दखल घेऊन दर्पण मीडिया समूहाकडून दर्पण न्यूज चे संस्थापक तथा मुख्य संपादक अभिजित रांजणे यांनी त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानपञ देऊन सन्मान केला.
या कार्यक्रमास आनंदराव भाऊ मोहिते, महेंद्र आप्पा लाड, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील , सरपंच सविता महिंद पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, दक्षिण भाग सोसायटी चेअरमन बाळासाहेब मोहिते, चितळे उद्योग समुहाचे उद्योजक गिरीष चितळे, मकरंद चितळे, माजी सरपंच शहाजी गुरव, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच श्रीकांत गायकवाड, बी.डी. पाटील, विलास आण्णा पाटील, ग्रामपंचायत सदस्य , व्यापरी संंघटनेचे पदाधिकारी, काँँँग्रेसचे पदाधिकारी, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले.