ताज्या घडामोडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा परीक्षेसाठीची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण : निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे

सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पुर्व परिक्षा 2020 दिनांक 14 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतू राज्यात वाढता कोरोना विषाणुंचा प्रदुर्भाव पाहता शासनाकडून खबरदारी म्हणून सदरची परिक्षा दिनांक 21 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिक्षेसाठी कोरोनाच्या विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व ती खबरदारी घेवून परिक्षेची तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा केंद्र प्रमुख मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिली आहे.
सांगली जिल्हा केंद्रावरती एकूण 27 उपकेंद्रावर एकूण 8932 उमेदवार राज्य सेवा पुर्व परिक्षा 2020 साठी बसलेले आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून 27 उपकेंद्रावर 27 उपकेंद्रप्रमुख, 124 पर्यवेक्षक, 432 समवेक्षक, 60 मतदनीस लिपिक, 54 शिपाई कर्मचारी व 36 वाहनचालक यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय उपजिल्हाधिकारी दर्जाचे 07 समन्वय अधिकारी व 02 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामार्फत परिक्षेच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाणार आहे.
कोरोना विषाणुंचा वाढता प्रादुर्भाव पाहता विविध उपाययोजना राबविण्याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानूसार परिक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची RTPCR टेस्ट करणेत आली आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष परिक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या 8 कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेली आहेत. सदरच्या कर्मचाऱ्यांऐवजी राखीव कर्मचाऱ्यांमधून निगेटीव्ह असलेल्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
परिक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी/कर्मचारी यांना परिक्षेसंदर्भात प्रशासनाकडून प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव पाहता उपकेंद्रावर खबरदारी म्हणून पुढीलप्रमाणे उपययोजना राबविण्यात येत आहेत. उमेदवारांना व प्रत्यक्ष परिक्षेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची परिक्षा हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर थर्मल गनद्वारे तपासणी करणेत येणार आहे, परिक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांसाठी मास्क, हातमोजे व सॅनिटायझर पुरविणेत येणार आहे, परिक्षेसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना ताप, सर्दी, थंडी अशी कोराना सदृश लक्षणे आढळून आल्यास त्यांना पीपीई कीटचा पुरवठा करणेत येणार आहे, परिक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे.
वरीलप्रमाणे करणेत आलेल्या उपाययोजनांची काटेकारे अंमलबजावणी करुन परिक्षा आयोगाच्या निर्देशानुसार सुरळित पार पाडण्यात येणार आहे. उमेदवारांनी आयोगाकडून प्राप्त झालेले परिक्षा प्रवेशपत्र सोबत घेवून येणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवारांनी परिक्षा उपकेंद्रावर कोरोना प्रतिबंधात्क उपाययोजनांची काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचेही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा केंद्र प्रमुख मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close