ताज्या घडामोडी
कोळा येथे रुद्रपशुपती कोळेकर महाराजांनी कोरोना लस घेतली
नागरिकांनाही केले लस घेण्याचे आवाहन

कोळे/वार्ताहार
कोळे ता. सांगोला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये श्री श्री श्री १०८ रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी यांनी शनिवारी कोरोनाची लस घेतली. दरम्यान, कोळे पंचक्रोशी मधील ज्येष्ठ नागरिकांनी तात्काळ लस घ्यावी असे आवाहन कोळेकर महाराजांनी केली आहे.
गेली एक वर्ष झाले कोरोना संसर्गाने आपले पाय घट्ट रोवले आहेत. जीवन मरणाच्या वाईट प्रसंगासह लॉकडाऊन संकल्पनांना समाजमन सामोरे गेले आहे. बंद हा आता पर्याय राहिलेला नाही. बंद टाळायचा असेल तर प्रत्येकाने तोंडाला मास्क, सुरक्षित अंतर ठेवणे आता काळाची गरज बनली आहे.गेल्या दोन महिन्यापूर्वी कोरोना संसर्गावर भारतीय शास्त्रज्ञांनी लस शोधून काढली आणि संपूर्ण जगाला एक आशेचा किरण निर्माण झाला. सध्या ही लस टप्याटप्याने दिली जात आहे. डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्र, पोलीस, शिक्षक असा प्राधान्य क्रम ठेवत आता ज्येष्ठ नागरिकांना ही लस दिली जात आहे. याचा समाजातील प्रत्येक ज्येष्ठांनी लाभ घ्यावा. एकही ज्येष्ठ नागरिक यातून राहणार नाही हेच आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे आवाहन कोळेकर स्वामी महाराज यांनी केले आहे.
यावेळी जि प सदस्य सचिन देशमुख,पत्रकार जगदिश कुलकर्णी तिप्पेहळीचे माजी सरपंच अरुण बजबळकर, युवा नेते बापू कोळेकर, पिंटू शीलवंत,गणेश नकाते विशाल आलदर, मेजर धोंडीराम बोधगिरे, डॉ नितीन काटे तिप्पेहळीचे माने कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल येलपले व डॉक्टर अमित गायकवाड प्रभारी वैद्यकीय अधिकारी धायगुडे, औषध निर्माता गणेश लवटे सुपरवायझर एच ए शिंदे आरोग्य सेवक रावसाहेब बंडगर, सिस्टर आर एस करांडे, पठाण सिस्टर, परिचारिका चव्हाण, के टी शिंदे, आशा वर्कर सविता माळी, मीना मोरे, सुवर्णा हतेकर, गीतांजली शेटे, नकुसा पांढरे, शुभांगी मोरे सायरा मुलानी गोडसे आलदर,हातेकर यांच्यासह आदी उपस्थित होते.
Share