ताज्या घडामोडी

गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेचा लाभ घ्या : आयुक्त ओम प्रकाश बकोरिया

  सांगली  : भारत सरकारची गूणवंत खेळाडू पेन्शन योजना ही गूणवंत खेळांडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे तसेच सक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणारी ही एक महत्वाची योजना आहे. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे. राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

            या योजनेच्या भारत सरकार युवा आणी क्रीडा मंत्रालयाच्या दि. ७ जून २०१८ रोजीच्या परिपत्रकातील निकष क्र. ६ अन्वये या योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्याने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त / गुणवंत खेळाडूंना मासिक मानधन देण्याची तरतूद पुढीलप्रमाणे आहे. ऑलिम्पिक / पॅरा ऑलिम्पिक गेम्स प्राविण्यधारक २० हजार रूपये, सुवर्ण पदक विश्वचषक / विश्व अजिंक्यपद स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) १६ हजार रूपये, रौप्य व कास्य पदक विश्वचषक स्पर्धा (ऑलिम्पिक व  एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) १४ हजार रूपये, सुवर्ण पदक – कॉमनवेल्थ गेम्स (एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स) १४ हजार रूपये, रौप्य व कास्य पदक – कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स १२ हजार रूपये. तसेच पेन्शन ३० वर्षापासून (किंवा सक्रिय क्रीडा पासून सेवानिवृत्तीची तारीख, जे नंतर असेल) मिळणाऱ्या खेळाडूवर देय असेल आणि त्याच्या / तिच्या आयुष्यादरम्यान कायम राहील. परंतु अशी पेन्शन लागू करताना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून निवृत्त झाले असतील. दर चार वर्षानी आयोजित होणाऱ्या विश्वचषक / विश्व अजिंक्यपद स्पर्धाकरिता ही योजना लागू राहील.

            याबाबत संबंधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असून विहीत नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष / सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव / आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांच्या स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावयाचा आहे. याबाबत अधिक माहिती https://www.yas.nic.in/sports/scheme-sports-fund-pension-meritorious-sportspersons या लिंकवर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close