ताज्या घडामोडी

धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजे भोसले यांना दर्पण मीडिया समूहाकडून अभिवादन

भिलवडी / सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र धर्म रक्षक
छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या 332 व्या स्मृती दिनानिमित्त विनम्रतापुर्वक अभिवादन.
महान साहित्यकार, प्रकांड प्राकृत पंडित, कूशल योद्धा, धर्मविर ज्याने आपला धर्म न बदलता स्वत:च्या जीवाचे बलिदान दिले व ते हसत हसत पत्करून मराठा मावळ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवून अस्मिता निर्माण केली. दगाबाजी व फितूर झालेल्या कपटी हरामी लोकाकडून शेवटी त्यांना पकडून दिल्याने एक धगधगती ज्वालामुखी शेवटी विझली.
संगमेश्वर वडी बु येथे त्यांच्या देहाचे तुकडे करून अस्ताव्यस्त फेकून दिले… औरंगजेबाच्या ह्या जुलमी अमानूश कृत्याचा धिक्कार, धर्म परीवर्तनासाठी केलेले हे कृत्य अतिशय वाईट आहे… पण धर्म स्वाभिमानासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपला बाणा न सोडता हसत हसत आपले प्राण धर्म रक्षणार्थ अर्पण केले…हा महान त्याग एक उच्च कोटीचा आदर्श आहे…
सर्व देहाचे तुकडे एकत्रितपणे करून त्याला शिवून त्या मृतदेहाला अग्नीसंस्कार करणारा एकटाच गोविंद महार होता , तो औरंगजेबाच्या आदेशाला न घाबरता आपल्या जीवाची पर्वा न करता धिरोदात्त पणे या निधड्या छातीच्या वीराने हा अग्नीसंस्कार केला.. गोविंद महार
अजरामर झाला…
ऐतिहासिक दृष्ट्या संभाजी राजेयांचा देह धारातिर्थी पडला… आजही लाखो लोक दोन्ही विरांच्या समाधिसमोर स्वाभिमानाने अभिवादन करतात…
एक विरगाथा तूम्हाआम्हा सर्वानाच सतत स्फूर्तिदायक राहो हीच खरी आदरांजली.
जय शिवाजी. जयभिम. जय जिजाऊ.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close