ताज्या घडामोडी

राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवार दिनांक 14 मार्च रोजी : जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी

   सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 रविवार दि. 14 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.  परिक्षा केंद्राच्या ठिकाणी दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत परिक्षा केंद्राच्या इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

या परीक्षेसाठी सांगली व मिरज शहरातील एकुण 27 परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रे पुढीलप्रमाणे  (१) शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज (२) सिटी हायस्कूल गावभाग सांगली (3) कै. ग.रा.पुरोहित कन्या प्रशाळा राजवाडा सांगली (४) वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग विश्रामबाग, सांगली (५) विद्यामंदिर मिरज, ब्राम्हणपुरी मिरज (६) श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, दक्षिण शिवाजीनगर गुलमोहर कॉलनी सांगली (७) ज्युबिली गर्ल्स इंग्लिश स्कूल मिरज (८) न्यू इंग्लिश स्कूल (माध्य.), पंढरपूर रोड मिरज (९) व्ही.पी. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, स्टडी ॲण्ड रिसर्च सांगली मिरज रोड वान्लेसवाडी सांगली (१०) संजय भोकरे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, टिळकनगर वान्लेसवाडी मिरज (Building C Polytechnic Wing) (११) डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीवाडी (१२) सांगली हायस्कूल सांगली आमराई जवळ सांगली (१३) मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल जिल्हा परिषद जवळ सांगली (१४) जवाहर हायस्कूल, शास्त्री चौक मिरज (१५) गुलाबराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मिरज (१६) श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल नेमिनाथनगर सांगली (१७) श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय बसस्थानकाजवळ सांगली (१८) कन्या महाविद्यालय मिरज, पवार बंगल्याजवळ मिरज (१९) विलिंग्डन कॉलेज विश्रामबाग सांगली (२०) राणी सरस्वती देवी कन्या शाळा तानाजी चौक पेठभाग सांगली (२१) श्रीमती चंबाबेन वालचंद शहा महिला महाविद्यालय रतनशिलनगर आमराईजवळ सांगली (२२) श्रीमती सुंदराबाई दगडे गर्ल्स हायस्कूल उत्तर शिवाजी नगर सांगली (२३) सौ. लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील विद्यालय सांगलीवाडी (२४) जी.ए. हायस्कूल हरभट रोड सांगली (२५) चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स सांगली मिरज रोड, विश्रामबाग सांगली (२६) सांगली हायस्कूल व श्री विनोद शिवाजी भाटे आर्ट सायन्स व कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, महावीरनगर आमराई जवळ सांगली (२७) शांतिनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शांतिनिकेतन लोकविद्यापीठ साखरकारखान्यासमोर सांगली.

वरील बंदी आदेश लागू असलेल्या वेळेत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. एकत्रित व गटागटाने फिरणे व उभा रहाण्यास मनाई केली आहे. सदर परीक्षा केंद्र परीसरात झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक या परीक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली आहे. परीक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे. सदरचा आदेश कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू रहाणार नाही.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close