ताज्या घडामोडी

कोल्हापूर स्वप्नसुंदरीच्या अश्विनी सांळुखे विजयाच्या मानकरी

कोल्हापूर : रविवार दिनांक ७/३ /२०२१ रोजी
केशवराव भोसले नाट्यगृहात अतिशय दिमाखदार सोहळ्यात कोल्हापूर ची स्वप्नसुंदरी हा कार्यक्रम पार पडला

कोल्हापूर ची स्वप्नसुंदरी एक वेगळी सौंदर्य स्पर्धा समकालीन आणि परंमपरेची एक वेगळी मिश्रण या स्पर्धेत बघायला मिळाले. महिलांना व नवीन पिढीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि व्यासपीठाचा अनुभव, आत्मविश्वास आणि त्यांचें व्यक्तिमत्व विकास करणे साठी हे उद्दिष्ट समोर ठेवून सीमा इंग्रोळे यांनी हा उपक्रम यशस्वी केला. सीमा इंग्रोळे मुळच्या कोल्हापूर च्या पण गेली बरीच वर्षे मलेशिया येथे स्थायिक झाल्या आहेत. मलेशियातून येवून स्रियांसाठी असा कार्यक्रम नियोजीत करून यशस्वी केल्याबद्दल त्यांचे सर्वजन कौतूक करत होते.

कार्यक्रमाची सुरूवात जेष्ठ नागरीक श्रीमती सुमती इंग्रोळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून झाले.

ही स्पर्धा ३ टप्प्यात झाली. बुद्घीमत्ता, इव्हीनींग गाऊन आणि नऊ वारी साडी अशा तीन राउंड मधील गुणवत्तेवर मिस आणि मिसेस कोल्हापूरच्या स्वप्नसुंदरी निवडल्या गेल्या.
मिस युनिवर्स कॅान्फिडंट स्श्रूती पाटोळे यांनी दोन दिवसांचे ग्रुमींग केले. सौ नीता मोकाशी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.

मिसेस मध्ये सौ ज्योती पाटील, सौ अश्वीनी साळूंखे विजयाच्या मानकरी झाल्या.अश्विनी साळुंखे यांना स्टाईल आयकॉन हे टायटल मिळाले.
सौ राखी पोतदार यांना कोल्हापूरची ब्रॅंड अम्बासिडेर च सन्मानित केले . या कार्यक्रमात 40 महिलांचा सहभाग होता.

तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील. शैक्षणिक, संगीत, सामाजिक, पोलिस क्षेत्रातील, क्रीडाक्षेत्रातील. धाडसी आणि ज्यानी लेखनीय कामगिरी केली आहे अशा खालील मान्यवर कर्तृत्ववान महिलांचा सत्कार महिला दिनानिमित्ताने करण्यात आला.
1) गौरी किशोर देशपांडे सामाजिक कार्य
2) Dysp सुनीता नासिककर (कुलकर्णी) 3) डॉ.भाग्यश्नी मुळे गायिका व लेखिका
4 ) सौ हर्षाली नांगरे पाटील यांनी धाडसी महिला
5) मानवी पाटील राष्ट्रीय सायकलपटू. 6) प्राचार्या शुभांगी गावडे शैक्षणिक कार्य.
7) कु.रेश्मा माने आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू
8) विजय जाधव संयोजक म्हणून. क्रीडमहर्षी श्नी शिवछत्रपती पुरस्कार प्रात कबड्डीपटू

या कारयक्रमामधे महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन, कार्यक्रमाला यशस्वी करन्यात सिंहाचा वाटा घेतला. या सर्व कार्यक्रमाचे निवेदन,परिक्षक यांनी आपले काम अतिशय सुरेख केले.

या कार्यक्रमात मा सौ निवेदिता घाटगे. राजमाता जिजाऊ संघटना , मा.सौ शौमिका महाडिक जिल्हा अध्यक्ष बीजेपी, मा सौ मनीषा वास्कर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, मा सौ हसिना फरास माजी कोल्हापूर महापौर , मा आदिल फरास माजी स्टाडी्ग कमिटी चेअरमन आणि
मा राजू मूल्लानी , मा रहिम संनदी , मा सुरेश मोरे हे सर्व मान्यवर उपस्थीत होते. या सर्वानी कार्यक्रमाची खूपच प्रशंसा केली .

कोल्हापूरची स्वप्नसुंदरी चे संयोजक म्हणून सौ सीमा इग्रोळे यांचा सत्कार करण्यात. पुढील काही महिन्यातच असाच कार्यक्रम विविध शहरात घेण्याचा त्याचा मानस आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close