सांगली

विजयमाला पतंगराव कदम यांच्या हस्ते भिलवडीत “भारती बझार “चे उद्घाटन

स्वप्नालीताई विश्वजित कदम, चितळे कुटुंब, भिलवडी, माळवाडी सरपंच यांची उपस्थिती

भिलवडी : मुख्य संपादक अभिजीत रांजणे 

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी येथे भारती बझारच्या 8 व्या शाखेचे भारती बझारच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम, चितळे कुटुंब, महिला सरपंच यांच्या हस्ते उद्घाटन  करण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास भारती बझारच्या संचालिका स्वप्नालीताई विश्वजित कदम, भारती बझारचे मुख्य व्यवस्थापक  जगन्नाथ शिंदे मामा,  सुनिता चितळे, पद्मजा चितळे, भक्ती चितळे, चितळे उद्योग समुहाचे उद्योजक गिरीष चितळे, मकरंद चितळे, एच. एम. आण्णा कदम, आनंदराव मोहिते, भिलवडीच्या सरपंच सविता महिंद पाटील,  माळवाडीच्या सरपंच सुरय्या तांबोळी, भिलवडी,माळवाडीचे सदस्य,  माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, माजी सरपंच श्रीकांत गायकवाड, माजी उपसरपंच मोहन तावदर, दक्षिण भाग सोसायटी चेअरमन बाळासाहेब मोहिते, पाटील डेअरीचे डी. सी. पाटील,  भिलवडी व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष जावेद तांबोळी, भारती विद्यापीठाचे राजेंद्र मोहिते, भारती बझार,भारती बँक, भिलवडी येथील मुख्य संस्थेचे अध्यक्ष, अधिकारी, पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले.

भारती बझारच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विजयमाला  पतंगराव कदम वहिणीसाहेब आपले मनोगत व्यक्त करताना भावूक झाल्या. 

भिलवडी येथील नागरिकांनी  नेहमीच कै. पतंगराव कदम साहेब यांच्यावर भरपूर प्रेम  केले.साहेबांनी कठीण प्रसंगी लोकांना साथ दिली.  विश्वजीत कदम हे त्याच जोमाने काम करत आहे. सामान्य लोकांकडून त्यांचे  कौतुक होत आहे. भारती बझारचा लोकांना चांगला फायदा होणार आहे. लोकांनी याचा लाभ घ्यावा.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close