सांगली

डॉ.पतंगराव कदम साहेब यांचा मंगळवारी तृतीय स्मृतिदिन

दर्पण मीडिया समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्यावतीने अभिवादन

कडेगाव: काँग्रेसचे नेते माजी मंत्री स्व. आमदार डॉ.पतंगराव कदम साहेब यांचा उद्या मंगळवारी तृतीय स्मृतिदिन आहे.
या पार्श्वभूमीवर राजकीय नेतेमंडळी ,कार्यकर्ते आणि साहेबप्रेमी नागरिक सोनहीरा साखर कारखाना परिसरातील स्मृती स्थळी दर्शनासाठी येणार आहेत .
दरम्यान साहेबांच्या स्मृतिस्थळाला आकर्षक
फुलांची सजावट करण्यात येत आहे.
डॉ.पतंगराव कदम सोनहीरा कारखाना परिसरातील स्मृतिस्थळावर मंगळवारी सकाळी ८:३० वाजता आमदार मोहनराव कदम व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित
कदम यांचेसह कदम कुटुंबिय डॉ.पतंगराव कदम साहेब यांना अभिवादन करण्यासाठी
उपस्थित राहणार आहेत.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कीर्तन कार्यक्रम होणार नाही .मास्क वापरणे आणि सोशल
डिस्टन्सिंग ठेवणे बंधनकारक असणार आहे.यावेळी कार्यकर्त्यानी व नागरिकांनी गर्दी न करता प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे .असे आवाहन डॉ.पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close