सांगली
भिलवडी ग्रामपंचायतकडून विकासकामाचे “करेक्ट” नियोजन
सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे प्रत्येक वॉर्डात जातीने लक्ष : नागरिकांत समाधान

भिलवडी : काँग्रेस प्रणित खंडोबा पॅनलने भिलवडी ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली. यामध्ये अनेक दिग्गजांचा कस पणाला लागला. सत्ता आल्यानंतर प्रामुख्याने उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांचे भिलवडीच्या विकासकामांसाठी करेक्ट नियोजन आणि सरपंच, सदस्यांचे प्रत्येक वॉर्डात जातीने लक्ष आहे. यामुळे तमाम नागरिकांतून कमी कालावधीत होत असलेल्या विकासाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
भिलवडी ग्रामपंचायत परिसरात 18 पग्गड जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. याला कै. बाळासाहेब काका पाटील आणि कै. पतंगराव कदम साहेबच जबाबदार असल्याचे मानावे लागेल. कारण या लोकांनी कधीही भिलवडी एक विशिष्ट जातीला धरून विकास केला नाही.
Share