कै. दादासाहेब पाटील ना.स.पतसंस्था शाखा माळवाडीच्यावतीने नूतन सरपंच,उपसरपंच यांचा सत्कार

भिलवडी : कै. दादासाहेब पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंकलखोप शाखा माळवाडी यांच्यावतीने भिलवडी, माळवाडी, धनगावच्या नूतन सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
भिलवडी गावचे नूतन सरपंच सविता महिंद-पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, माळवाडीच्या सरपंच सूरया तांबोळी, उपसरपंच अजिंक्य कदम, धनगावचे सरपंच सतपाल सांळुखे, उपसरपंच कुसूमताई सांळूखे यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन धैर्यशील पाटील, व्हा. चेअरमन भगवान शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिलवडी गावचे माजी सरपंच शहाजी गुरव यांनी केले. यावेळी सतीश सरडे, धन्यकुमार पाटील, चंद्रकांत पाटील, अधिकराव पाटील, रामचंद्र माळी, संताजी जाधव, शाखेेेचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच शहाजी गुरव यांनी ग्रामपंचायतीच्या विकासासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सूचना केली. भिलवडी गावचा विकास झपाट्याने वाढत आहे. सुरूवात अतिशय सुंदर असल्याचे स्पष्ट केले.
चेअरमन धैर्यशील पाटील यांनीही अंकलखोपच्या विकासासंबंधी माहिती दिली. लोकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सत्कार करण्यात आल्याबद्दल भिलवडी गावचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांनी संस्थेचे आभार मानले.