सांगली

भिलवडी येथील सरळी पूल ते मुख्य पुलापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण होणार

कंञाटदांंचे आश्वासन :1मार्चचा रास्ता रोको रद्द

भिलवडी : येत्या 6 मार्चपर्यंत धुळीचा त्रास पूर्णपणे कमी करण्यासाठी रस्ता दुरुस्तीचं काम आजपासून हाती घेत आहे. सरळी पूल ते मुख्य पुलापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण होणार असल्यामुळे धुळीचा त्रास कमी करण्यासाठी तूर्तास डीबीएम लेअरचा रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन  कंत्राटदार रुचिर मोहरील यांनी दिले.

एक मार्च रोजी होणार्या रास्ता रोको संदर्भात भिलवडी व्यापारी संघटना ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते. निवेदनाची तातडीने दखल घेत रस्त्याचे मुख्य कंत्राटदार रुचिर मोहरील 27 रोजी  भिलवडीला चर्चा करण्यासाठी आले. येत्या 6 मार्चपर्यंत धुळीचा त्रास पूर्णपणे कमी करण्यासाठी रस्ता दुरुस्तीचं काम आजपासून हाती घेत आहेत. सरळी पूल ते मुख्य पुलापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण होणार असल्यामुळे धुळीचा त्रास कमी करण्यासाठी तूर्तास डीबीएम लेअरचा रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

शनिवारी सकाळी झालेल्या बैठकीस भिलवडीचे नेते संग्राम दादा पाटील,दक्षिण भाग सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब काका मोहिते,माजी उपसरपंच चंद्रकांत भाऊ पाटील, माजी उपसरपंच श्रीकांत गायकवाड,  भिलवडीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील,सचिव महेश शेटे ,सा.बा.वि.चे सहाय्यक अभियंता संकेत पाटील, पत्रकार अभिजित रांजणे उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close