सांगली

शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार : सहाय्यक पोलिस निरीक्षक कोडग

कोरोना कालावधीत भिलवडी पोलिसांनी केला १० लाख २७ हजार रुपयांचा दंड वसूल

भिलवडी : शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असून कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भिलवडी पोलिसांनी मार्च २०२० पासून फेब्रुवारी अखेर दहा लाख २७ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला,अशी माााहिती भिलवडी पोलिस स्थानकाचे साहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी दिली.

मार्च २०२० पासून आज अखेर भिलवडी पोलिसांनी, भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सोळा गावांमध्ये सांगली पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम,अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबूले व तासगाव उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग व पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप यांनी  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या होत्या.मार्च महिन्यांपासून आज अखेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिलवडी पोलिसांकडून कायद्याचा बडगा उगारून विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या , मोटारसायकल वरून डबल सीट फिरणाऱ्या ,बाजारपेठेतील दुकानासमोर सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्या, शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर  भा, .द.वि.स.कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन अधि.२००५ चे कलम ५१ अन्वये गुन्हे दाखल असून शाबीत २६ गुन्हे तसेच कलम १८८ प्रमाणे ७१७ खटले व विना मास्क १३९५ केसेस करून एकूण १० लाख २७ हजार रकमेचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close