सांगली

भिलवडी व्यापारी संघटनेच्यावतीने नूतन सरपंच,उपसरपंच,सदस्यांचा सत्कार

दर्पण समूहाकडून भिलवडी व्यापारी संघटनेचा कोरोना योद्धाने सन्मान

भिलवडी : व्यापारी संघटनेच्या वतीने भिलवडी ग्रामपंचायतीचे सरपंच सविताताई महिंद-पाटील,उपसरपंच पृथ्वीराज पाटील आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
शिवजयंती दिनी झालेल्या प्रश्नमंजुषेच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आणि घरोघरी शिवजयंती साजरी करणाऱ्या शिवभक्तांचा सत्कार केला
केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सांगलीच्या महिला अध्यक्षा मीनाताई मदने अंकलखोपच्या माजी सरपंच श्वेताताई बिरनाळे आणि भिलवडीच्या प्रगतशील महिला शेतकरी उज्ज्वलाताई पाटील या विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी स्वागत केले.

मीनाताई मदने म्हणाल्या, की व्यापारी संघटनेने कोरोना काळात केलेले काम आणि रक्ताची टंचाई असताना आयोजित केलेले रक्तदान शिबीर जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरले.

श्वेताताई बिरनाळे म्हणाल्या, की आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रांमध्ये महिला काम करीत आहेत.50 टक्के आरक्षण असल्यामुळे राजकीय क्षेत्रातही महिलांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे.
यावेळी राज्यस्तरीय सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेचे संचालक सचिन नावडे यांचाही सत्कार करण्यात आला.
दर्पण समूहाच्यावतीने दर्पणचे मुख्य संपादक अभिजीत रांजणे यांनी कोरोना काळामध्ये व्यापारी संघटनेने केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना कोविद योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते सिद्दीक जमादार यांना सन डीटीएच डिश आणि शिवप्रतिमा, भारत एंटरप्रायजेस आणि चेतन भोसले यांना शिवप्रतिमा देऊन गौरवण्यात आले.
व्यापारी संघटनेचे सचिव महेश शेट्टे यांनी आभार मानले. दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
उपाध्यक्ष दिलीप कोरे ,,रणजीत पाटील खजिनदार, दिलावर तांबोळी, सहसचिव विजय शिंदे सर्व संचालक आणि ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close