ताज्या घडामोडी

संगणकीकृत सातबारामधील चुका दुरूस्त करण्यासाठी मालगाव येथे 3 मार्चला कॅम्प  

सांगली : मिरज तालुक्यामध्ये प्रलंबित असणाऱ्या सर्व प्रकारच्या नोंदीबाबत उदा. दस्त, वारस, कर्ज, बोजा, साठेखत इत्यादी चे अर्ज स्विकारण्याकामी तहसिल कार्यालय मिरज येथे म्युटेशन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामध्ये सातबारा नोंदीबाबतचे अर्ज स्विकारण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरूस्त करण्यासाठी मालगाव, बेळंकी, आरग या मंडळांतर्गत समाविष्ट सर्व गावासाठी मालगाव येथे 3 मार्च 2021 रोजी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार संगणकीकृत सातबारामधील चुका दुरूस्त करण्यासाठी अर्जदारांनी अर्ज करून त्यासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन तहसिलदार मिरज यांनी केले आहे.

 

 

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close