सांगली

भिलवडी सार्वजनिक वाचनालयामध्ये उद्योगपती काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे अनावरण

काकासाहेब चितळे यांना विविध ठिकाणी अभिवादन

भिलवडी : भिलवडी ता.पलूस येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यास कक्षात माजी अध्यक्ष स्व.काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात करण्यात आले.साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व वाचनालयाचे उपाध्यक्ष चिंतामणी जोग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी बोलताना प्रा.वैजनाथ महाजन म्हणाले की,काकासाहेब चितळे हेअनासक्त कर्मयोगी होते.ग्रामीण भागात गुणवान विद्यार्थी आहेत.या गोष्टींचा अभ्यास करून काकासाहेब चितळे यांनी भिलवडी वाचनालयात अभ्यास कक्ष सुरू केला आहे.या ठिकाणी विविध स्पर्धा परीक्षेसाठी सुसज्ज अशी लायब्ररी उभारण्यात यावी हिच खरी काकासाहेबांना आदरांजली ठरेल.
चिंतामणी जोग म्हणाले की,काकांच्या कामातून समाजासाठी आपण देणं लागतो या भावनेतून काम करण्याची प्रेरणा निर्माण होते.काकासाहेब चितळे हे मोठी सामाजिक जाणीव असणारे उद्योजक होते असे प्रतिपादन बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे यांनी व्यक्त केले.
सन्मित्र मंडळ यांच्या वतीने भिलवडी राममंदिर येथे सेवाधर्म या विषयांवर वैजनाथ महाजन यांचे प्रवचन झाले.
प्रास्ताविक व स्वागत सुभाष कवडे यांनी तर आभार भू.ना.मगदूम यांनी मानले.या कार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे,मकरंद चितळे, निखिल चितळे,जे.बी.चौगुले,डी.आर.
कदम,जयंत केळकर,ए.के.चौगुले, प्रा. एम.आर.पाटील,अभिजित रांजणे,
शरद जाधव आदि उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close