भिलवडी येथे “अँनिमल राहत”च्या चिञकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमाचे आयोजन : दर्पण मीडिया समूहाचा सहभाग

भिलवडी : सांगली जिल्ह्य पलूस तालुक्यातील भिलवडी येथे अँनिमल राहत आणि दर्पण मीडिया समूहतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या चिञकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नेहमीच अँनिमल राहत जगभरात विविध सामाजिक उपक्रम राबवते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भिलवडी येथे अँनिमल राहत आणि दर्पण मीडिया समूहाने मुलांना प्राणी आणि पक्षी अभयारण्य यांची ओळख निर्माण व्हावी म्हणून चिञकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत तब्बल 25 ते 30 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेत मुलांनी विविध पक्षी आणि प्राणी यांची चिञे सुंदर रेखाटली होती. या स्पर्धेसाठी अँनिमल राहत यांनी चिञ रेखटण्यासाठी सर्व साहित्य दिले होते. अँनिमल राहतचे शिक्षण अधिकारी किरण कंठे यांनी केले मुलांना प्राण्यांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. खेळीमेळीच्या वातावरणात चिञकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दर्पण मीडिया समूहाचे संस्थापक तथा मुख्य संपादक अभिजित रांजणे यांनीनी मोठे सहकार्य केले.