
या मुलाच्या रोमांचक प्रवासाविषयी51 व्या इफ्फीमधील वर्ल्ड पॅनोरामा विभागात प्रदर्शित झालेल्या समर रिबेल या चित्रपटाच्या दिग्दर्शिका मार्टिन साकोवा म्हणाल्या, “एका 11 वर्षाच्या मुलाच्या नजरेतून ही कथा सांगितली जाते. या कठीण परिस्थितीमध्ये ही कथा अनेक कुटुंबांना नैतिक आधार देईल अशी मला आशा आहे. मैत्री, विश्वास आणि आपुलकी आणि प्रेम भावना हा या चित्रपटाचा आशय आहे. चित्रपटातील भावना प्रेक्षकांना समजतील आणि या चित्रपटातील विशेष विनोद त्यांना चांगले वाटतील.” 51 व्या इफ्फी मध्ये आज पाचव्या दिवशी (20 जानेवारी 2021) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
“माझ्या लहानपणी देखील मी विभक्त कुटुंबाच्या समस्येचा सामना केला होता, परंतु माझ्या आजोबांसोबत माझे बालपण खूप चांगले गेले,” अशी कबुली दिग्दर्शिकेने यावेळी दिली. जोनासची भूमिका साकारणारा एलीचा व्हिसकोसिल हा बालकलाकार एक उत्स्फूर्त आणि हुशार अभिनेता आहे, त्याने या भूमिकेच्या मागणीनुसार अभिनय केला असून तो नवीन काहीतरी करण्यासाठी नेहमी तयार असायचा.
चित्रपटासाठी ‘समर रिबेल’ हे शीर्षक का निवडले या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मुलांना एकसारखी स्थिती आवडत नाही, त्यांना बदल हे हवेच असतात.”