सांगली

मार्जिन मनी योजनेकरिता प्रस्ताव सादर करा : सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने

सांगली, दि. 21 : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेकरिता इच्छुक लाभार्थींनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे शासन निर्णयातील अटी व शर्तीची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने यांनी केले आहे.
या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय स्टॅडई-2020/प्र.क्र.23/अजाक दि. 9 डिसेंबर 2020 अन्वये शासन स्तरावरून निश्चित करण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे श्री. बन्ने यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close