सांगली

नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार : सहायक आयुक्त ज. बा. करीम

  • सांगली, दि. 21: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली मार्फत शैक्षणिक, नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी दि. 28 जानेवारी 2021 रोजी दुपारी 11.30 ते 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक युवक, युवतींनी या सेमिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.

पदवी नंतरचे शिक्षण व रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ही सेमिनार आयोजित करण्यात आली असून यंग प्रोफेशनल मॉडेल करिअर सेंटर ठाणे चे आशुतोष साळी हे प्रमुख मागर्दर्शक आहेत. तसेच या सेमिनारमध्ये सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आ. बा. तांबोळी यांचा सहभाग असणार आहे.
इच्छुक युवक व युवतींनी http://bit.ly/3p5HRBd या लिंकवर आपली नोंदणी करावी व सेमिनारच्या https://meet.google.com/qdt-muqz-ypw?hs=224 या लिंकवर विहीत वेळेत सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close