अपक्ष उमेदवार भाऊसाहेब रुपटक्के यांच्या निवडणूक प्रचारास शुभारंभ

माळवाडी : पलूस तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीची रणधुमाळी जोर धरु लागली आहे. गुरुवार दिनांक 7 /1 /2021रोजी जय हनुमान महायुती ग्रामविकास पॅनेल व जय हनुमान ग्रामविकास पॅनेल व काही अपक्ष उमेदवार यांचा प्रचाराचा शुभारंभ झाला..
तर शुक्रवार दिनांक 8/1/2021 रोजी वार्ड क्रमांक ४ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी निवडणूक लढवित असलेले सामाजिक कार्यकर्ते व अपक्ष निर्भीड उमेदवार मा.भाऊसाहेब रुपटक्के यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ माळवाडी गांवाचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. माळवाडी ग्रामपंचायत निवडणूक वार्ड क्रमांक ४ चे अपक्ष निर्भिड उमेदवार मा. भाऊसाहेब रुपटक्के यांचा प्रचाराचा शुभारंभ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सांगली जिल्हा अध्यक्ष राजेश तिरमारे उर्फ नंदू अण्णा यांच्या हस्ते झाला. या प्रचार शुभारंभासाठी पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अध्यक्ष, बोध्दीसत्व माने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी पलूस तालुका अध्यक्ष, अविराज काळेबाग, शहराध्यक्ष – मनोज होवाळ , भीमशक्ती संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष – अमरजीत कांबळे , पत्रकार – पंकज गाडे, नितीन काळे , सुरज शेख , सचिन टकले , सामाजिक कार्यकर्ते – शरद कुरणे , सलीम शेख , सोपान सकट , बाळासाहेब वाघमारे , विजय साबळे , बाळासाहेब मोटकट्टे , संग्राम मोटकट्टे , सोमनाथ हेगडे , आदी सह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात माळवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी वार्ड क्रमांक ४ मधून रिंगणात उतरलेले अपक्ष निर्भीड उमेदवार मा.भाऊसाहेब रुपटक्के यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगली जिल्हा अध्यक्ष मा. राजेश तिरमारे यांनी जाहीर केले.तर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया – सांगली जिल्हा अध्यक्ष – सतीशजी लोंढे व अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य.. सांगली जिल्हा अध्यक्ष – संजय कांबळे यांनी पाठिंबा दिला आहे.वार्ड क्रमांक ४ मध्ये अनु-जाती प्रवर्ग या जागेसाठी परस्पर विरोधी दोन पॅनेलचे दोन उमेदवार व अपक्ष उमेदवार मा.भाऊसाहेब रुपटक्के या तीन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत असल्यामुळे संपूर्ण गांवाचे लक्ष वार्ड क्रमांक ४ कडे लागून राहिले आहे.